अहमदनगर दि.२५ ऑक्टोबर
राज्यातील बहुचर्चित पांगरमल दारू कांड प्रकरणातील आरोपी भीमराज आव्हाड यांची औरंगाबाद हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे एडवोकेट एस. एस. काझी यांनी भीमराज आव्हाड यांच्यावतीने काम पाहिले होते. तर एडवोकेट गुगळे यांनी सहकार्य केले होते.
अहमदनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दरम्यान १३ फेब्रुवारी २०१७ रोजी पांगरमल येथे बनावट विषारी दारु प्यायल्यामुळे चौघांचा मृत्यू झाला. काही दिवसांत ही संख्या वाढली होती . याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती तत्कालीन नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे यांनी गुन्ह्याचा तपास करुन १७ आरोपींना अटक केली. नंतर जिल्हा रुग्णालयातील कँटीनमध्ये सुरू असलेले बनावट विषारी दारुनिर्मितीचे रॅकेट उजेडात आले. एकूण १९ आरोपींची नावे गुन्ह्यात निष्पन्न झाली होती या प्रकरणात सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये आरोप ठेवण्यात आले आहेत.
सात वर्षांपासून जेलमध्ये असलेल्या आरोपींना अखेर जामीन मिळाला असून याप्रकरणी काही आरोपी याआधीच जमिनीवर सुटलेले आहेत तर काहींचा पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाला आहे.
अहमदनगर दि. ६ डिसेंबर सुमारे सहा वर्षांपूर्वी जिल्हा परिषद निवडणूकीच्या काळात घडलेल्या नगर तालुक्यातील पांगरमल विषारी दारूकांडाच्या गुन्ह्यात फरार असलेली संशयित आरोपी जिल्हा परिषदेची माजी सदस्य भाग्यश्री गोविंद मोकाटे हीचा जामीन मंजूर झाला असून अहमदनगर जिल्हा न्यायालयाचे जिल्हा सत्र न्यायाधीश गोसावी यांनी भाग्यश्री मोकाटे हिस जामीन मंजूर केला आहे. भाग्यश्री…
अहिल्यानगर दिनांक 11 डिसेंबर नगर अर्बन बँकेच्या कर्ज प्रकरणाची फसवणूक केल्याप्रकरणी नगर येथे प्रतिष्ठित डॉक्टर निलेश शेळके याला अहमदनगर जिल्हा न्यायालयात जामीन मंजूर झाला असून अटी आणि शर्तीवर तसेच कर्जफेड रकमेच्या परतफेड हमीवर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. २४ जून २०२४ रोजी आर्थिक गुन्हे विभागाच्या पथकाने डॉक्टर निलेश शेळके यास…
अहमदनगर दि.१७ डिसेंबर अहमदनगर मध्ये ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या विवेक गायकवाड खून प्रकरणातील संशयित आरोपी अमित विलास निस्ताने याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. विवेक गायकवाड हा मोल मजुरी करून उदरनिर्वाह चालवत होता मर्डर'चा उलगडा करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले होते. पोलिसांनी अमित विलास निस्ताने ज्याला खून प्रकरणानंतर…