अहमदनगर दि २५ ऑक्टोबर
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी करिता सकल मराठा आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नगर तहसील कार्यालया समोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणी करता जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. सरकारला दिलेली चाळीस दिवसांची मुदत २४ ऑक्टोबर रोजी संपल्यामुळे आजपासून पुन्हा मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून राज्यभर ठीक ठिकाणी उपोषण आणि आंदोलने सुरू झाली असून अहमदनगर शहरातही सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नगर तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
सरकारला चाळीस दिवसांचा वेळ सरकारला देऊनही सरकारने आरक्षणाबाबत कोणतीही ठोस भूमिका जाहीर केली नाही त्यामुळे आता सरकारला वेळ न देता सरकारने लवकरात लवकर आरक्षणाविषयी भूमिका जाहीर करावी अन्यथा येत्या २८ ऑक्टोबर पर्यंत साखळी उपोषण करणार असून त्यानंतर आमरण उपोषणाचा इशाराही यावेळी उपोषणाला असलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे .