अहमदनगर दि.२५ ऑक्टोबर
राज्यातील बहुचर्चित पांगरमल दारू कांड प्रकरणातील आरोपी भीमराज आव्हाड यांची औरंगाबाद हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे एडवोकेट एस. एस. काझी यांनी भीमराज आव्हाड यांच्यावतीने काम पाहिले होते. तर एडवोकेट गुगळे यांनी सहकार्य केले होते.
अहमदनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दरम्यान १३ फेब्रुवारी २०१७ रोजी पांगरमल येथे बनावट विषारी दारु प्यायल्यामुळे चौघांचा मृत्यू झाला. काही दिवसांत ही संख्या वाढली होती . याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती तत्कालीन नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे यांनी गुन्ह्याचा तपास करुन १७ आरोपींना अटक केली. नंतर जिल्हा रुग्णालयातील कँटीनमध्ये सुरू असलेले बनावट विषारी दारुनिर्मितीचे रॅकेट उजेडात आले. एकूण १९ आरोपींची नावे गुन्ह्यात निष्पन्न झाली होती या प्रकरणात सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये आरोप ठेवण्यात आले आहेत.
सात वर्षांपासून जेलमध्ये असलेल्या आरोपींना अखेर जामीन मिळाला असून याप्रकरणी काही आरोपी याआधीच जमिनीवर सुटलेले आहेत तर काहींचा पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाला आहे.