Homeशहरभटक्या कुत्र्यांचा हैदोस सुरूच... बारा ते पंधरा कुत्र्यांनी गायीच्या वासरावर केला हल्ला......

भटक्या कुत्र्यांचा हैदोस सुरूच… बारा ते पंधरा कुत्र्यांनी गायीच्या वासरावर केला हल्ला… निर्बीजीकरण नेमके कोणाचे होतेय? अनेक कुत्र्यांची पिल्ले रोजच जन्माला येतायेत… मनपा प्रशासन नेमकं काय करतेय…

advertisement

अहमदनगर दि.२६ ऑक्टोबर
अहमदनगर मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच असून एका गायीच्या छोट्या वासरा वर बारा ते पंधरा भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून या वासराला मरासन्न अवस्थेत करून सोडल आहे. मात्र काही सजग नागरिकांनी या कुत्र्यांपासून या छोट्या वासराला सोडल्यामुळे या वासराचा जीव वाचला आहे. मात्र या अवस्थेत असलेल्या वासराचा जीव कधीही जाऊ शकतो. ही घटना चितळे रोडवरील चौपाटी कारंजा जवळ घडली आहे या ठिकाणी राहत असलेले समीर तांबे यांनी या वासराची भटक्या कुत्र्यांपासून सुटका केली त्यामुळे या वासराचा जीव वाचला मात्र कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे या वासराचा जीव कधीही जाऊ शकतो.

पहाटेच्या सुमारास भटक्या कुत्र्यांनी वासरावर हल्ला केल्यामुळे झालेल्या आवाजामुळे समीर तांबे यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता एका छोट्या वासरावर बारा ते पंधरा कुत्रे हल्ला करत होते या वासराचे लचके तोडत होते मात्र भयभीत झालेले वासरू आपला जीव वाचवण्यासाठी पाळण्याचा प्रयत्न करत असतानाही कुत्रे त्याच्या अंगावर झेप घेऊन हल्ला करत होते समीर तांबे यांनी करून दगड मारून या कुत्र्यांना हाकलून दिले मात्र या कुत्र्यांच्या हल्ल्यात हे वासरू गंभीर जखमी झाले होते. समीर तांबे यांनी तातडीने प्रथमोपचार म्हणून घरातील हळद घेऊन वासराच्या जखमेवर टाकली तर काही वेळानंतर डॉक्टरांना बोलून इंजेक्शनही दिले होते मात्र दहा ते बारा कुत्र्यांनी केलेले हल्ल्यामुळे वासरू मरासन्न अवस्थेत गेले होते.

या वासराला सध्या पांजरपोळ येथे नेण्यात आले असून त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार केले जाणार आहेत. मात्र या छोट्याशा वासरावर झालेल्या हल्ल्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत कारण पहाटेच्या सुमारास अनेक छोटे छोटे लहान मुले क्लाससाठी शाळेत जाण्यासाठी बाहेर पडत असतात त्यामुळे अशा भटक्या कुत्र्यांचा हल्ला या क्लासला जाणाऱ्या छोट्या मुलांवरही होऊ शकतो त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिक करू लागले आहेत.

इकडे अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने भटक्या कुत्र्यांचे निर्बीजकरण करण्यासाठी करोडो रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. मात्र रोजच अनेक कुत्र्यांचे पिल्ले नगर शहरात जन्मताना दिसून येत आहेत मग नेमकं निर्बीजीकरण कोणाचे केले जाते असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तर भटक्या कुत्र्यांच्या बाबत बंदोबस्त करण्यासाठी महानगरपालिकेने काय उपाययोजना केली आहे. कारण या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अहमदनगर शहरात आज पर्यंत लहान मुले आणि वयोवृद्ध लोकांचे प्राण गेलेले आहेत मात्र फक्त लाखो करोड रुपये या कुत्र्यांच्या नावावर खर्च करून सुद्धा नगरकरांना याचा काहीच फायदा होत नसल्याने हे पैसे नेमके कुठे जातात असाही सवाल आता समोर येत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular