Home राजकारण माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतले मोहटा देवीचे दर्शन समर्थक मुकुंद गर्जे...

माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतले मोहटा देवीचे दर्शन समर्थक मुकुंद गर्जे यांच्या घरी दिली भेट

पाथर्डी दि.२१ जून
माजी मंत्री भाजप नेत्या पंकजा मुंडे आज अहमदनगरच्या दौऱ्यावर आल्या होत्या . त्यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर पाथर्डीतील त्यांचे समर्थक मुकुंद गर्जे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्या मुकुंद गर्जे यांच्या घरी जाऊन पंकजा मुंडे यांनी भेट घेतली तसेच पाथर्डी मध्ये विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली तसेच मोहटादेवीचे दर्शन त्यांनी घेतली तसेच अहमदनगरच्या स्नेहालय संस्थेत भेट दिली. तेथील उपेक्षित मुलांसोबत आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला.

विधान परिषदेची उमेदवारी डावल्यानंतर पंकजा मुंडे या नाराज असल्याचं समजतंय मात्र त्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केली नाही. मात्र त्यांच्या समर्थकांकडून भाजप वर अनेक आरोप करण्यात आले आहेत.याबाबतही पंकजा मुंडे यांनी कोणतीही भूमिका जाहीर केली नाही. आज पाथर्डी येथे ते आपली भूमिका जाहीर करतील अशी शक्यता होती मात्र त्यांनी कोणतीही राजकीय भूमिका जाहीर न करता त्यांच्या नाराजी बद्दल सस्पेन्स कायम ठेवला आहे दोन दिवसांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील देवराई येथे झालेल्या सोसायटी निवडणुकीनंतरच्या धुमश्चक्रीत एका तरुणाचा बळी गेला होता त्या पालवे कुटुंबियांची भेट घेऊन पंकजा मुंडे यांनी पालवे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version