पारनेर दि.१२ जून
पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे युवा नेते राहुल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या एका कार्यक्रमात खासदार सुजय विखे पाटील यांनी पारनेर तालुक्यातील राजकारणावर चांगलीच बॅटिंग केली. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचे नाव न घेता त्यांनी पारनेर तालुक्यात चाललेल्या राजकारणाबाबत चांगलीच कठोर टीका केली आहे.
पारनेर तालुका हा चांगल्या विचारांचा तालुका असल्याचं मला माझ्या पणजोबा आणि आई-वडिलांनी सांगितले होते. मात्र राजकारणात काही दिवसापासून बदलत चाललेल्या गोष्टी पाहता पारनेर तालुक्यात अनेक चुकीच्या गोष्टी घडत असल्याचे त्यांनी सांगितले. वयोवृद्ध लोक तरुण मुलांच्या पाय पडतात ही लाजिरवाणी गोष्ट असून. मुलींवर अत्याचार होत आहेत डॉक्टरांना मारहाण होत आहे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण होत आहेत मात्र गुन्हे दाखल होत नाही हे चित्र आता आपल्याला बदलायला हवं असाही घणाघात त्यांनी आपल्या भाषणात केला आहे.
पहा व्हिडिओ