अहमदनगर दि.२८ मार्च
आयपीएल सामने सुरू झाले असून आयपीएल सामने सुरू झाले की सट्टेबाजी जोरात सुरू होते पोलीस अनेक वेळा या सट्टेबाजांवर छापे टाकून कारवाई करतात मात्र सट्टेबाजी ही एक अशी कीड लागलेली आहे किती आता समूळनष्ट होणे शक्य नाही असेच म्हणावे लागेल. आता या सट्टेबाजी मध्ये नवनवीन तंत्रज्ञान आल्यामुळे पोलिसांसमोरही सट्टेबाजी रोखण्याचे मोठे आव्हान आहे. पोलिसांच्या पुढे चार पावले असलेले सट्टेबाज आता विविध तंत्रज्ञान वापरून सट्टेबाजी करत आहेत.
सट्टेबाजी आता काही काळासाठी मर्यादित राहिली नाही. सट्टेबाजी वर्षभर सुरू असते. जे प्रमुख बुकी आहेत ते एका “आयडी” द्वारे हा सर्व खेळ करतात. ज्या कोणाला सट्टेबाजी करायची आहे त्यासाठी सुरुवातीला मोबाईल रिचार्ज प्रमाणे पैसे मुख्य बुकी कडे जमा करावे लागतात त्यानंतर तो बुकी सट्टेबाजी करणाऱ्याला त्याने दिलेल्या रूपयांचे रिचार्ज मारून देतो पैसे संपले की खेळ खाल्लास पुन्हा पैसे द्या आणि खेळ सुरू करा असा काहीसा प्रकार सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे आता कोणाच्याही मोबाईल वरून हा खेळ खेळता येतो मुख्य बुकी “आयडी”वरून या सर्व खेळावर लक्ष ठेवून असतो. खेळाच्या पैशाचा व्यवहारही ऑनलाईन होत असतो त्यामुळे अशा “बुकी” ना अनेक खेळणार्याना पकडण्यासाठी आता पोलिसांनाही तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल.
सट्टेबाजी फक्त क्रिकेट मॅच वरच नाही तर बारा महिने 24 तास सुरू असलेल्या जगातील विविध खेळांवर सट्टेबाजी सुरू असते. जर तेथे सट्टेबाजी करायची नसेल तर त्या आयडी मध्ये असलेले पत्त्यांचे विविध प्रकार त्यावरही तुम्ही जुगार खेळू शकता आणि पैसे कमवू शकता मात्र बहुतांश प्रकारात खेळणारे खेळी कधीच जिंकत नाहीत मात्र “आयडी” देणारे मुख्य बुकी मात्र गब्बर होत चाललेले आहेत. अनेक तरुण सध्या या आयडीच्या विळखात गुंतले असल्यामुळे कर्जबाजारी होत आहेत. अत्यंत जलद गतीने आणि सोप्या पद्धतीने “आयडी” मिळत असल्यामुळे अनेक तरुणांच्या मोबाईल मध्ये हा आयडी आपल्याला पाहायला मिळू शकतो.