Home राजकारण निष्ठेची चेष्टा… की अजून काही.. तीस वर्षांपेक्षा जास्त वर्ष नगर शहर मतदारसंघात...

निष्ठेची चेष्टा… की अजून काही.. तीस वर्षांपेक्षा जास्त वर्ष नगर शहर मतदारसंघात भगवा फडकत असताना 2024 ला कुठे मशी शिंकली आणि शिवसेना उमेदवारीच्या शर्यतीतून बाहेर पडली…

अहिल्यानगर दिनांक 26 ऑक्टोबर

पंचवीस वर्षां पेक्षा जास्त वर्ष अधिराज्य असणाऱ्या पूर्वीची शिवसेना आणि आत्ताची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला अहमदनगर शहरातून विधानसभेला जागा मिळावी यासाठी झगडावे लागले ही एक मोठी शोकांतिका आहे.

1990 ते 2014 पर्यंत या नगर शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा डौलात फडकत होता मात्र 2014 आणि 2019 साली या ठिकाणी शिवसेनेला पराभवला समोरे जावे लागले मात्र तरीही नगर शहर शिवसेनेत जिवंतपणा होता.शिवसैनिक कुठेही डगमगले नाही. नगर शहरात शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचण्याचा काम कै.माजी आमदार अनिल राठोड यांनी केले होते. कै.माजी आमदार अनिल राठोड यांची आणि जनतेची नाळ अशी जोडली होती की ती कुणीही तोडू शकत नव्हते. कै.माजी आमदार अनिल राठोड यांनी आपल्या आमदारकीच्या काळात अनेक आव्हाने पेलली अनेक वेळा शिवसेना फुटली आता शिवसेना संपते का काय असे प्रश्न निर्माण होत असतानाच शिवसेना पुन्हा फिनिक्स पक्ष प्रमाणे भरारी घेत होती दिवसेंदिवस शिवसेनेचे तेज वाढतच गेले होते.

2014 आणि 2019 मधील काही कै.माजी आमदार अनिल राठोड यांचा पराभव अनेक शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला होता. त्यावेळी अनेक आरोप प्रत्यारोप ही झाले कै.माजी आमदार अनिल राठोड यांच्या पराभवाचे खापर त्यांच्या जवळच्या माणसांवर फोडले गेले मात्र तर ही कै.माजी आमदार अनिल राठोड डगमगले नव्हते. मात्र कोरोनाच्या काळात नियतीने डाव साधला आणि आमदार राठोड यांचे निधन झाले तरीही शिवसेना अजूनही अभेद्य आहे. मात्र या शिवसेनेला नगर शहर मतदार संघात उमेदवारीसाठी मोठा संघर्ष करावा लागला हीच का निष्ठावंत सैनिकांची किंमत आहे असा प्रश्न आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने समोर आला आहे.

राज्यात मधल्या काळात राजकीय पक्षांमध्ये मोठी उलथापालक झाली शिवसेना दुभंगली गेली मात्र तरीही अहिल्यानगर मधील शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच राहिले. अहमदनगर महानगरपालिकेवर आजपर्यंत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकत होता पंचवीस वर्ष आमदारकी याच नगर शहराने शिवसेनेला दिली होती. मात्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी कडून नगर शहर मतदारसंघ हा प्रामुख्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडेच जायला हवा होता या पक्षाकडून अनेक इच्छुक होते मात्र एखाद्याला तिकीट मिळाले असते तर सर्वजण एक दिलाने काम करणारे होते. तरीही वरिष्ठ पातळीवर नगर शहर मतदारसंघाबाबत का विचार केला गेला नाही हा ही प्रश्न आता समोर येत आहे. महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली मात्र अभिषेक कळमकर ही काही दिवसांपूर्वी शिवसेनेत होते राज्यात झालेल्या पक्ष फुटा फुटी नंतर ते पुन्हा शरद पवार यांच्या सोबत आले तर त्यांचे काका दादाभाऊ कळमकर हे पूर्वीपासूनच शरद पवार यांच्या बरोबर होते. नगर शहर मतदार संघात या आधी राठोड विरुद्ध कळमकर अशी लढत नगरकरांनी पाहिली आहे. या लढतीत राठोड यांनी नेहमीच बाजी मारली होती. आता त्याच अभिषेक कळमकर या पुढच्या पिढीतील युवकाला तिकीट मिळाल्यामुळे शिवसेनेतील कै.माजी आमदार अनिल राठोड यांचे पुत्र विक्रम राठोड हे त्यांचा महाविकास आघाडीचा धर्म म्हणून प्रचार करतील त्यामुळे एक राजकीय वर्तुळ पूर्ण झाल्याचं पाहायला मिळू शकते.

मात्र अनेक आव्हाने पेलत अनेक वादळे झेलत नगर शहरात शिवसेना भक्कमपणे उभा होती मात्र आता विधानसभेला उमेदवारी न मिळाल्याने अनेक निष्ठावंत शिवसैनिक नाराज झाले आहेत.आपल्या भावना आता त्या सोशल मीडिया द्वारे व्यक्त करू लागले आहेत. इतक्या वर्षांच्या निष्ठेचे फळ जर मिळत नसेल तर पक्ष काय कामाचा अशा विविध भावना कार्यकर्ते सोशल मीडियाद्वारे बोलून दाखवू लागले आहेत. गेल्या पंचवीस वर्षांपासून अधिराज्य असलेल्या शिवसेनेला आता पुढील काळातही हा मतदारसंघ मिळतो का नाही हा प्रश्न सतावतोय जर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा कडून अभिषेक कळमकर यांचा विजय झाला तर या मतदारसंघावर पुढील काळात राष्ट्रवादीचाच बोलबाला राहील हे निश्चित.

नगर शहरतील मागील राजकीय इतिहास
पाहता पूर्वी एखादा नेता आणि पक्ष हे जवळपास
जनतेसाठी कायमचे असायचे नेत्यासह कार्यकर्ते
यांची नाराजी असली अथवा राज्य पातळीवरील
राजकिय तडजोडी झाल्यावर तिकीट नाकारले गेले
तरीही पक्षाची आणि नेत्यांची असलेली
निष्ठा जपण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते अहोरात्र कष्ट
करायचे पक्षासह आपल्या नेत्याचा
भरघोस मतांनी विजय झाला पाहिजे अशी अनेकांची
भूमिका असल्याचे चित्र नगरच्या जनतेने
पाहिले आहे मग आताच्या निवडणूक काळात
कार्यकर्त्यांना विचारात न घेता वरिष्ठ पातळीवर नेते मिनिटाला बदलत असल्यामुळे कार्यकर्त्याची
नेत्यांच्या विषयी चांगलीच नाराजी खुलेआम
व्यक्त होत आहे तरीही नेते कार्यकर्त्यांना
विचारात घेत नाहीत.

त्यामुळे आता नेमका कोणता झेंडा घेऊ हाती असे विदारक चित्र शहरात पाहण्यास मिळत आहे त्यामुळे नगर शहरात निष्ठेची मोठ्या प्रमाणात नेत्यांनी चेष्टा लावली असून त्यामुळे कार्यकर्त्यांसह जनतेमधून मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर ऐकण्यास
मिळत आहे परिणामी त्यामुळे चालू असलेल्या
विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल
लागण्याची शक्यता नाकारता येत नाही असे
नागरीकातून बोलले जात आहे..

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version