अहमदनगर : दि .२० एप्रिल कापडबाजारातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्यास शिविगाळ करत मारहाण करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी भिंगारवाला चौकाजवळील द्वारकादास लस्सीसेंटरसमोर ही घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी प्रकाश सखाराम घोलप यास अटक केली आहे. महिला पोलिस कर्मचाऱ्याने त्याविरोधात फिर्याद दिली आहे.
महिला पोलिस कपडबाजारत कर्तव्यावर असताना
एका आरोपीच्या शोधासाठी त्या कापडबाजारात सायंकाळी चाललेल्या होत्या. त्या वेळी द्वारकादास लस्सी दुकानासमोर वाहतुकीची कोंडी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी ती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. आडवी तिडवी वाहने घालणाऱ्या वाहनचालकांना त्या वाहने मागे पुढे घेण्याबाबत सूचना देत होत्या. आरोपी घोलप हाही त्या वाहतूक कोंडीत अडकलेला होता. त्यास वाहन पुढे घेण्यास सांगितले असत त्याचा राग येवून त्याने महिला पोलिसास शिवीगाळ सुरु केली. त्यावेळी फिर्यादी या मी पोलिस नाईक आहे. वाहतूक सुरळीत करण्याचे माझे कर्तव्य आहे, तुम्ही शिवीगाळ करून वाद न घालता तुमचे वाहन बाजूला घ्या असे समजावून सांगत असताना आरोपी घोलप याने फिर्यादीचा हात पकडून शिवीगाळ करत चापटीने त्यांना मारहाण करू लागला. तसेच फिर्यादीची गळ्यातील ओढणी ओढत त्यांना लज्जा उत्पन्न होईल,Vअसे वर्तन करत त्यांचा विनयभंग केला. त्यावरुन फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी प्रकाश घोलप याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यावर कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. योगिता कोकाटे व पोलिस
पथकाने आरोपी घोलप त्यास रात्री अटक केली.