Homeक्राईमनगरच्या प्रसिद्ध उद्योगपतींनी सरकारी यंत्रणेला हाताशी धरून केला मोठा उद्योग...सत्तरवर्षीय महिलेला फसवून...

नगरच्या प्रसिद्ध उद्योगपतींनी सरकारी यंत्रणेला हाताशी धरून केला मोठा उद्योग…सत्तरवर्षीय महिलेला फसवून केली जमिनीची विक्री..शहरातील अनेक मोठे उद्योगपती आरोपींच्या पिंजऱ्यात..तर सहा. दुय्यम निबंधक,मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्यावर गुन्हा दाखल…

advertisement

अहमदनगर दि १४ एप्रिल
आहमदानगर शहारालगत असलेल्या निंबळक येथील सिंधुबई निकम या आदिवासी भिल्ल समजच्या महिलेला फसवून त्यांच्या मालकीची जमीन विक्री करून त्या महिलेची फसवणूक केली ची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. सिंधुबाई मुरलीधर निकम या 70 वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली आहे.

या घटनेचे हकीगत अशी की सिंधुबाई मुरलीधर निकम यांची वडिलोपार्जित शेती निंबळक येथे असून या जमिनीवरच निकम यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आहे. ही शेतजमीन मिळकतीचे इंग्रज काळापासून ही जमीन आदिवासी इसमांना भुमीहिन व्हावे लागू नये व त्यांचे संरक्षण व्हावे त्याकरीता सदर मिळकतीस आदिवासी मिळकत म्हणून तशी नोंद घेतलेली होती.
या आदिवासी असल्याने हस्तांतरास बंदी असा शेरा देखील तदनंतर शासनाने सदर मिळकतीच ७/१२ सदरी घेतलेला होता.

मात्र ही जमीन अहमदनगर शहरातील काही मोठे उद्योगपती आणि महसूल विभागाचे सहा. दुय्यम
निबंधक कार्यालय, वर्ग २, मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी मिळून या जमिनीवरून कायदेशीर असलेले मिळकतीचे इतर हक्कात असलेल्या आदिवाशी मिळकत हस्तांतरणास बंदि असा शेरा स्वतःच्या आर्थीक फायदया करीता बेकायदेशीर रित्या हटवून सदर मिळकतीचे बेकायदेशीर व पोकळीस्त खरेदीखते स्वतःचे नावे करुन घेतली आहे.

या प्रकरणी आता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून अहमदनगर शहरात सह जिल्ह्यातील अनेक मोठे उद्योगपती या गुन्ह्यात सामील झाले आहेत.

दिनेश भगवानदास छाबरीया, सरला भगानदास छाबरीया,शिवाजीराव आनंदराव फाळके, आशिष रमेश पोखरणा,जयवंत शिवाजीराव फाळके,आकाश राजकुमार गुरनानी,माणिक आनंदराव फाळके, आशिष रमेश पोखरणा, कामगार तलाठी हरिश्चंद्र विजय देशपांडे, मंडल अधिकारी दिलीप श्रीधर जायभाय, मा सहा. दुय्यम निबंधक साहेब, वर्ग २, अन न १, आशा सरकारी अधिकारी आणि उद्योगपतींवर भादंविक १२०(ब), ४२०, ४६७, ४६८, ४७०, ४७१, ४७४, सह ३४ अन्वये तसेच अनुसुचित जाती जमाती कायदा (अॅट्रॉसीटी) १९८९ च्या कायदा कलम ३ (जी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हा हा न्यायालयाने सी आर पी सी १५६ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्या वरुन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular