HomeUncategorizedनगर शहरातील लव्ह बर्डस कॅफे,बाबाज कॅफे,हर्षाज कॅफे,झेड के कॅफे,गोल्डरश कॅफे,रिजकिंग कॅफे, या...

नगर शहरातील लव्ह बर्डस कॅफे,बाबाज कॅफे,हर्षाज कॅफे,झेड के कॅफे,गोल्डरश कॅफे,रिजकिंग कॅफे, या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे छापे…कॅफे हाउसच्या नावाखाली कॉफी शॉपचा बोर्ड लावुन सुरू होते तरुण तरुणींचे अश्लील चाळे.. सात कॅफे चालकांना विरुद्ध गुन्हे दाखल…

advertisement

अहमदनगर दि.८ जानेवारी

अहमदनगर शहरातील कॅफे हाऊस नावाखाली सुरू असलेल्या छोट्या छोट्या कम्पार्टमेंट मध्ये सुरू असलेल्या अश्लील चाळे करणाऱ्या तरुण तरुणींना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.

नगर शहरातील कॅफेत छोटी छोटी कम्पार्टमेंट बनवुन तरुण मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठ मोबदला घेवुन जागा उपलब्ध केली जाते अशा तक्रारी पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या कडे आल्या होत्या.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी शहरातील कॅफे हाऊस तपासण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय तुषार धाकराव, सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पवार, अतुल लोटके, पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाणे, अमृत आढाव, रविंद्र घुंगासे, बाळासाहेब गुंजाळ, जालिंदर माने, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल भाग्यश्री भिटे,सोनाली साठे,उमाकांत गावडे, अरुण मोरे यांच्या पथकाने सावेडी उपनगरातील १) श्रीराम चौक, पाईपलाईन रोड येथील लव्ह बर्डस कॅफे, २) कुष्टधाम रोड येथील बाबाज कॅफे, ३) गुलमोहर रोड येथील हर्षाज कॅफे, ४) नगर मनमाड रोडवरील कोहिनुर
मॉल समोरील झेड के कॅफे, अहिंचा चौक, बुरुडगांव रोड, इगलप्राईड कॉम्प्लेक्स मधील ५) गोल्डरश कॅफे व चाणक्य चौकातील ६) रिजकिंग कॅफे अशा ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तपासणी केली असताना तरुण मुल मुली अश्लील चाळे करताना आढळून आले.

पोलिसांनी तुमच्या कॅफे हाऊसवर छापे टाकले हाऊस चालवण्याचा परवाना कोणत्याही त्याचे चालकाकडे नव्हता हे विशेष तसेच कॅफे हाउसच्या नावाखाली
कॉफी शॉपचा बोर्ड लावुन कुठलीही कॉफी, पेय अगर खाद्यपदार्थ विक्रीस न ठेवता आतमध्ये मुलामुलींना बसण्यासाठी कम्पार्टमेंट बनवल्याने आरोपी नामे १) महेश मच्छिद्र तेलोरे, रा. तपोवन रोड, सावेडी अहमदनगर, २) ऋषीकेश सखाराम निर्मळ रा.
झोपडी कॅटीन, अहमदनगर (फरार) (लव्हबर्डस कॅफे) ३) रोहित कुमार साठे, रा. तपोवन रोड सावेडी, अहमदनगर, ४) हर्षवर्धन भाऊसाहेब काकडे, रा. तपोवन रोड, सावेडी अहमदनगर (हर्षाज कॅफे), ५) सागर अशोक उदमले रा. हिवरेझरे, ता. नगर (झेड के. कॅफे), ६) रवि रघुनाथ चौरे, रा. गायकेमळा, कल्याण रोड, अहमदनगर (गोल्डरश कॅफे) ७) अर्जुन
ईश्वर कचरे रा. कानडेमळा, सारसनगर, अहमदनगर (रिजकिंग कॅफे) आरोपींविरुध्द कारवाई करुन कोतवाली वतोफखाना पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२९, १३१ (क) (क) प्रमाणे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कॅफेमध्ये मिळुन आलेल्या तरुण मुला मुलींचे पालकांना बोलावुन त्यांच्या समक्ष तरुणांना समज देवुन पालकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular