श्रीगोंदा दि.९ ऑक्टोबर
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सहाय्यक फौजदार सुनील मोरे यांनी दसऱ्याच्या दिवशी गळाफास घेऊन आपल्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर सुनील मोरे यांच्या कुटुंबीयांनी बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
या प्रकरणात दिगवंत सहाय्यक फौजदार सुनील मोरे यांची पत्नी कीर्ती मोरे यांनी मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव,पोलीस महासंचालक ,विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवून बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ हे छोट्या छोट्या कारणावरून सुनील मोरे यांना अपमानित करून शिवीगाळ करत होते तसेच दुधाळ यांनी सात जुलै व 14 जुलै 2022 रोजी कसूर केल्याबाबत ठपका ठेवून कसुरी अवहाल पाठवून बदलीबाबत वरिष्ठांना कळविले होते. त्यामुळे माझे पतीचे मानसिक खच्चीकरण झाल्याने त्यांनी आत्महत्याचा मार्ग स्वीकारला या सर्व प्रकारला पोलीस निरीक्षक दुधाळ हे जबाबदार असल्याने पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी कीर्ती मोरे यांनी केले आहे.
तर बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे सुनील मोरे यांच्या आत्महत्या नंतर चांगलेच चर्चेत आले होते. याबाबत त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांची बदली नाशिक ग्रामीण विभागात करण्यात आली असल्याची माहिती समोर येत असून याबाबत नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांनी आदेश काढल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे.