Home राजकारण काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची स्व.अनिलभैय्या राठोडांबद्दलची ही पोस्ट सोशल मीडियावर होत...

काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची स्व.अनिलभैय्या राठोडांबद्दलची ही पोस्ट सोशल मीडियावर होत आहे व्हायरल… किरण काळे आणि विक्रम राठोड या दोन नेत्यांमध्ये राजकीय गुफ्तगू.

अहमदनगर दि.१६ सप्टेंबर :

गुरुवारी शहरातील शिवसेनेचे ( shivsena) पदाधिकारी, नगरसेवक माजी मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मुंबईला जाऊन आले. त्यानंतर नाराज झालेल्या शिवसैनिकांची आज सायंकाळी शहरात बैठक पार पडली. माजी महसूल मंत्री,(Former Revenue Minister)काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ.बाळासाहेब थोरात यांचा नगर शहर दौरा आज झाला. यावेळी त्यांनी जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या समवेत काँग्रेस व किरण काळे यांच्या चितळे रोड (chitale road ) येथे लवकरच सुरू होणाऱ्या जनसंपर्क कार्यालयाला देखील भेट दिली. त्यानंतर काँग्रेसचे किरण काळे आणि शिवसेनेचे विक्रम राठोड या दोन नेत्यांमध्ये चितळे रोड या ठिकाणी राजकीय गुप्तगु (Political gossip )आणि जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या गप्पा चांगल्याच रंगलेल्या पाहायला मिळाल्या.(ahmednager Political )

शिवसेना उपनेते, माजी मंत्री अनिलभैय्या राठोड (anil bhaiya rathod) यांच्या आठवणींना उजाळा देणारी पोस्ट काळे यांच्या फेसबुक वॉलवर आणि समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल होत आहे. याची नगरकरांमध्ये चांगलीच चर्चा होत आहे.

काळे यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले आहे ?
काळे यांची पोस्ट : मी आणि विक्रमजी राठोड…. थोड्या वेळापूर्वी, एका निवांत क्षणी… यावेळी खूप मनमोकळ्या गप्पा झाल्या. स्व. जननायक अनिलभैय्या राठोड यांनी मला सामाजिक, राजकीय आयुष्यात वावरत असताना जनसामान्यांची कामे कशी केली पाहिजेत याबाबत केलेल्या मार्गदर्शनाच्या अनेक जुन्या आठवणींना यावेळी उजाळा दिला… अनिलभैय्यांच्या नुसत्या आठवणीत सुद्धा खूप मोठी ऊर्जा आहे…”

“चितळे रोडच्या काँग्रेस पक्षाच्या व माझ्या सुरू होणाऱ्या नवीन कार्यालयाचे “लोकभवनात” रूपांतर करताना स्व.अनिलभैय्यांच्याच विचारांच्या प्रेरणेने जनसेवेचे काम मी करणार आहे… आपल्या सगळ्यांना नगरकरांना या शहरात राहण्याचा अभिमान वाटवा असे विकसित आणि सर्वार्थाने समृद्ध शहर निर्माण करण्यासाठी मी आणि माझे सहकारी झपाटून काम करणार आहोत.”

स्व.अनिलभैय्या राठोड (Anilbhaiyya Rathod)
यांनी शहरात राष्ट्रवादी समवेत कायम संघर्ष केला. आज रोजी शहरातील जवळपास सगळ्याच पक्षांचे राजकीय साटेलोटे आणि आपापसातील जिव्हाळ्याचे संबंध पाहता त्यांच्या निधनानंतर स्थानिक राष्ट्रवादी नेतृत्वाला विरोध करणारा आक्रमक चेहरा म्हणून किरण काळे यांच्याकडे पाहिले जाते. त्यातच स्व. अनिलभैय्या यांचे चिरंजीव असणारे युवा नेते विक्रम राठोड यांची आणि किरण काळे यांची अलीकडील काळात वाढलेली राजकीय जवळीक ही भविष्यात शिवसेना व काँग्रेस या दोन पक्षांना राजकीय दृष्ट्या व महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने एकत्र आणते की काय हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

गेल्या पंचवीस वर्षापासून अहमदनगर शहराचे राजकारण हे चितळे रोड वरील नेता सुभाष चौकातील स्वर्गीय आमदार अनिल राठोड यांच्या कार्यालया भोवती फिरत होते. नगर शहरातील कोणतेही निवडणूक असो चितळे रोड आणि शिवालय या कार्यालयापासून या निवडणुकीची सुरुवात होत होती. अनेक मोठमोठे निर्णय चितळे रोड वरूनच घेतले गेले असल्यामुळे चितळे रोडला एक राजकीय महत्व आहे. त्यामुळे आता काँग्रेसचे कार्यालयही चितळे रोडला येत असून या आधीच राष्ट्रवादीचे कार्यालय चितळे रोडवरच आहे.त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे कार्यालय चितळे रोडच्या आसपास आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष काहींना काही कारणाने या रोडशी जोडले गेले आहेत

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version