Homeशहरनगर मधील राजकीय पक्षाचा "तो" पदाधिकारी सर्वसामान्य नागरिकांकडून करतोय खंडणी वसूल.....

नगर मधील राजकीय पक्षाचा “तो” पदाधिकारी सर्वसामान्य नागरिकांकडून करतोय खंडणी वसूल.. त्या विधीज्ञाच्या आरोपाने एकच खळबळ….*

advertisement

अहमदनगर दि.५ ऑक्टोबर
अहमदनगर शहरातील सर्वसाधारण सामान्य जनतेला त्रास देऊन एका राष्ट्रीय राजकीय पक्षाचा पदाधिकारी लाखो रुपयांची खंडणी मागत असल्याचा आरोप आज नगरमध्ये एका पत्रकार परिषदेत एका विधीज्ञाने केला आहे. अहमदनगर मध्ये झालेल्या एका पत्रकार परिषद एका राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर करण्यात आला असून यामुळे या आरोपांची आता चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

त्यांचे पोलीस संरक्षण काढावे अशी मागणी करण्यात आली असून पदाच्या जोरावर हे पदाधिकारी खंडणी उकळण्याचे काम करत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत एका विधिज्ञाने केल्याने खळबळ उडाली आहे. ज्या खंडणी उकळणाऱ्या त्या पदाधिकारी विरोधात पत्रकार परिषद घेणाऱ्या त्या विधीज्ञाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना त्याबाबत लेखी पत्र दिले असल्याचे पत्रकार परिषदेत दाखवण्यात आले. शहराच्या मध्यवर्ती भागातील एक नेता हे काम करत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला असून सर्वसामान्य लोकांच्या महानगरपालिकेकडे तक्रार करून तसेच इतर शासकीय संस्थांकडे तक्रार करून त्यानंतर त्या सर्वसामान्य लोकांकडून पैसे उकळण्याचे काम या राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकार्या कडून होत असल्याचा हा गंभीर आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. एका कॉन्ट्रॅक्टरला 50 लाख रुपयांचा चुना अशाच प्रकारे लावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच जर काही पुरावे पोलिसांना लागत असेल तर ते पुरावे आणि तक्रारदार आपल्याबरोबर असल्याचेही पत्रकार परिषदेत खुलासा करण्यात आला आहे. हे सर्व अत्यंत गंभीर आरोप असून याबाबत आता पोलीस प्रशासन काही भूमिका घेणार का ? आणि पक्ष काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular