अहमदनगर दि. ५ ऑक्टोबर
नगर शहरातील नगर छत्रपती संभाजी नगर महामार्गावर गजराज नगर शेजारील एका पेट्रोल पंपावर गोळीबाराची घटना घडली असून यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. ही गोळी डोक्यात घुसली असल्याचं प्राथमिक माहिती प्रत्यक्ष साक्षीदारांनी दिलीय पोलिसांना ही माहिती काळताच तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तर जखमी झालेल्या ही इसमास कळमकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ही गोळीबारची घटना कोणत्या कारणातून झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नसून पोलीस तपास सुरू आहे.