अहमदनगर दि.२१ डिसेंबर
प्रोफेसर कॉलनी चौकातील महानगरपालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलामागे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. मात्र हे स्वच्छतागृह फक्त नावापुरतेत असून या ठिकाणी मोठी कचराकुंडी झाली आहे. त्यामुळे स्वच्छतागृहात जाताना दुर्गंधी आणि घाणीमुळे स्वच्छतागृहात कोणीही प्रवेश करत नाही आणि मग भिंतीचा आधार घेतच या ठिकाणी लघु शंका केली जाते. त्यामुळे तिथून जाणाऱ्या येणाऱ्या महिलांची कुचंबना होते तसेच महिलांसाठी बांधलेलं स्वच्छतागृह कधीच उघडलेलं दिसले नाही.
या ठिकाणी या परिसरातील व्यवसाय करणारे व्यावसायिक आपला सर्व कचरा स्वच्छतागृहाच्या समोर टाकतात त्यामुळे येथे कचरा कुंडी निर्माण झाली असून हजारो रुपयांचं बांधलेलं स्वच्छतागृह बंद पडले आहे. आणि नागरिक बाहेरच लघु शंका करत असल्याने परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेने याकडे लक्ष देऊन स्वच्छता करून साफ करून या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे.
याबाबत महानगरपालिकेचे नगरसेवक भाजपचे शहर अध्यक्ष भैय्या गंधे यांनीही आयुक्तांना निवेदन देऊन स्वच्छतागृह समोरील कचरा हटवण्यासाठी मागणी केली होती मात्र त्या मागणीलाही महानगरपालिकेने केराची टोपली दाखवली आहे. कारण या ठिकाणी पाऊल ठेवणे मुश्कील आहे इतकी प्रचंड घाण या परिसरात असते.
स्वच्छतागृह साफ होते मात्र वर्षातून एकदाच फक्त दाखवण्यापुरतेच
या ठिकाणचे स्वच्छतागृह साफ होतं मात्र फक्त ते दाखवण्यापुरतं साफ होतानाचा चित्र नेहमीच पाहायला मिळतं. स्वच्छता अभियान स्पर्धा समितीचे सदस्य नगर शहर जेव्हा निरीक्षण करण्यासाठी येतात तेव्हा या ठिकाणचे स्वच्छतागृह साफ केले जाते रंगरंगोटी केली जाते आत मध्ये बेसिनमध्ये नळ बसवले जातात पाण्याची टाकी भरली जाते मात्र जशी या सदस्यांची पाठ फिरते तसं हे सर्व सामान गायब होतं आणि स्वच्छतागृहाला कुलूप लावले जाते ही शुद्ध फसवणूक या सदस्यांची केली जाते.