Homeशहरगांजा तस्करीतील गुन्हयामध्ये सुमारे एक वर्षापासुन फरार असलेल्या आरोपी पारनेर येथील माजी...

गांजा तस्करीतील गुन्हयामध्ये सुमारे एक वर्षापासुन फरार असलेल्या आरोपी पारनेर येथील माजी ग्रामसेवक जेजुरकरला पुणे येथील अंमली पदार्थ विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या

advertisement

अहमदनगर दि.७ जानेवारी
पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्हाई गावातील कैलास पवार यांच्या घरी एका चार चाकी गाडीतून 128 किलो 7005 ग्रॅम गांजा पोलिसांनी पाच फेब्रुवारी 2022 रोजी जप्त केला होता त्यावेळी पोलिसांनी एकुण ३३,४१,९००/- रुपये चा ऐवज जप्त करण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांनी कैलास पवार यांच्याविरुद्ध विरुध्द लोणीकंद पोलीस ठाण्यात ४९/२०२२ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ ( क ).२० ( ब ).ji (क) प्रमाणे गुन्हा नोंदवला होता.


या गुन्हयामध्ये आरोपी कैलास पवार याच्याकडे मिळुन आलेल्या १२८ किलो ७६५ ग्रॅम गांजा बाबत
तपास करत असताना तो त्याने अहमदनगर येथील केडगाव परिसरातील लोंढे मळा येथील किशोर किसनराव जेजुरकर याचेकडुन विक्री करीता आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

पुणे पोलिसांचे एक पथक किशोर जेजुरकर याला पकडण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात आले होते मात्र याची खबर त्याला आधीच लागल्यामुळे तो फरार झाला होता किशोर जेजुरकर हा पारनेर येथे ग्रामसेवक म्हणून सरकारी कामात कार्यरत असताना तो पाच फेब्रुवारी 2020 पासून कामावर आला नसल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले होते.

मात्र एक वर्षाच्या कालावधीनंतर पुणे येथील अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी योगेश मोहिते यांना मिळालेल्या माहितीनुसार किशोर जेजुरकर हा अहमदनगर शहरात वास्तव्यात असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पदार्थ विरोधी पथक क्रमांक एकचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड ब्यानी एक पथक नेमून त्यात सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील कर्मचाऱ्यांनी अहमदनगर येथील केडगाव येथे मिळालेल्या माहितीनुसार लोंढे मळा येथे किशोर जेजुरकर यांच्या घरावर छापा टाकून किशोर जेजुरकर या ताब्यात घेतले आहे

या प्रकरणाचा पुढील अधिक तपास अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक डि. एल. चव्हाण पुणे शहर हे करीत आहे.
.
ही कारवाई ही पोलीस आयुक्त पुणे शहर, रितेश कुमार
पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे,रामनाथ पोकळे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे सहा पो आयुक्त गुन्हे १ गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक,१ गुन्हे शाखा पुणे शहर कडील विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार योगेश मोहिते, मनोजकुमार साळुंके, विशाल शिंदे, विशाल दळवी, मारुती पारधी, ज्ञानेश्वर घोरपडे, राहुल जोशी, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, पांडुरंग पवार, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव यांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular