Homeशहरसावेडी गाव ते बालिकाश्रम रोड  परिसरातील विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत करा....

सावेडी गाव ते बालिकाश्रम रोड  परिसरातील विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत करा. मनपा महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पाताई बोरुडे यांचे आयुक्तांना निवेदन

advertisement

अहमदनगर –  प्रभाग क्रमांक ८ मधील सावेडी गांव ते बालिकाश्रम रोड परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. सदर परिसरातील वाल मोठ्या प्रमाणात लिकेज आहे. त्यामुळे सदरील परिसरामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.  तर काही भागात कायमस्वरूपी वाल सतत चालु असतात. त्यामुळे पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे परिसरातील नागरीकांना पाणी संकटाला सामोरे जावे लागत आहे. याचबरोबर विविध प्रश्नांना सामोरे जावे लागते. सदरील परिसरातील नागरीकांनी पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याबाबत माझ्याकडे वारंवार तक्रारी करत आहेत याचबरोबर खंडोबा मंदिर भागात पाणीपुरवठा करणारे नवीन पाईपलाईल टाकणे बाकी आहे.

याबाबत संबंधीतांना आदेश देण्यांत यावे. याचबरोबर बालिकाश्रम रोड परिसराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करावा तसेच ठीक ठिकाणी असणारे लिकेज तातडीने दुरुस्त करावे अन्यथा परिसरातील नागरिकांसमवेत आपल्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा मनपा महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पाताई बोरुडे यांनी आयुक्त डॉ.पंकज जावळे यांना निवेदनाद्वारे दिला.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular