Home क्राईम अवैध गॅस रिफीलींग सेंटरवर छापा नऊ लाखांचा  मुद्देमाल जप्तडीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाची...

अवैध गॅस रिफीलींग सेंटरवर छापा नऊ लाखांचा  मुद्देमाल जप्तडीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाची कामगिरी

वडाळा दि.२६ ऑगस्ट

डीवायएसपी संदीप मिटके यांना मिळालेल्या माहिती नुसार नगर – औरंगाबाद  रोड वर वडाळा बहिरोबा शिवारातील हॉटेल साई सबुरीचे पाठीमागे अवैध गॅस रिफिलिंग सेंटर असून घरगूती गॅस मधून चारचाकी वाहनांमध्ये गॅस भरला जात आहे त्या नुसार नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड यांच्या समवेत पुरवठा विभागातील कर्मचारी आणि पोलीस पथकाने त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला.

या अवैध गॅस रिफालिंग ठिकणी 5,00,000 रू कि चा . एक अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो क्रमांक MH 16 CC 2488 , 2,08,000 रू.कि च्या भारत गँसच्या अर्धवट निळ्या रंगाच्या कमर्शिअल मोकळ्या 87 गँस सिलेन्डर 19.5किलो क्षमतेच्या, 12,000रू कि.च्या नोझलला लावलेल्या इंडियन गँसच्या कमर्शिअल मोकळ्या 5 गँस सिलेन्डर 19.5किलो क्षमतेच्या,2500 रू कि.चा एक HP कंपनीची घरघुती गँस सिलेन्डर 14.5किलो क्षमतेचा अंदाजे 5किलो गँस असलेला,1,32,000रू किमतीचे टेम्पोमध्ये भरलेल्या भारत गँसच्या अर्धवट निळ्या रंगाच्या कमर्शिअल भरलेले 30 गँस सिलेन्डर 19.5किलो क्षमतेचे ,22,000 रू.कि चे टेम्पोमध्ये भरलेले इंडियन गँसचे अर्धवट निळ्या रंगाचे कमर्शिअल 05गँस सिलेन्डर 19.5किलो क्षमतेचे असा एकूण सुमारे नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यानुसार आरोपी विरुद्ध पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात भादवी कलम 379,285,34 सह जिवनावश्यक वस्तु कायदा 1955 चे कलम 3,7 सह LPG पुरवठा वितरन आणि नियमन आदेश 2000 चे कलम 3,4,5,6,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक. मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांचे मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड, पुरवठा अधिकारी रुपाली मोडसे, एपीआय रामचंद्र करपे,एएसआय राजेंद्र आरोळे, हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर माळवे, रमेश लबडे, संतोष वाघ,पोकॉ. नितीन शिरसाठ आदींनी केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version