Home क्राईम सपट चहाच्या कंपनीच्या नावाशी साम्य आणि कंपनीच्या नावाचा लोगो वापरून नगर शहरात...

सपट चहाच्या कंपनीच्या नावाशी साम्य आणि कंपनीच्या नावाचा लोगो वापरून नगर शहरात बनावट चहा पत्तीची विक्री

अहमदनगर दि.२६ ऑगस्ट

अहमदनगर शहरातील डाळ मंडी भागात एका दुकानावर छापा टाकून सापट या नामांकित कंपनीच्या नावाशी साम्य असलेल्या आणि साम्य असलेला लोगो वापरून बनावट चहा पतीची विक्री करणाऱ्या एका दुकानावर सपाट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्याने आणि शहरउपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या पथकाने छापा टाकून बनावट चहा पत्ती जप्त करण्याची कारवाई केली आहे.. या छाप्यात बनावट चहाचे पाऊच जप्त करण्यात आले आहेत.

अहमदनगर शहरात सपट या कंपनीच्या नावाची साम्य असणारे आणि लोगो असणाऱ्या बनावट चहाची विक्री होत असल्याची माहिती सपट कंपनीला मिळाल्यानंतर सपट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे विक्री व्यवस्थापक अजय मोरे यांनी अहमदनगर मध्ये येऊन पोलिसांच्या मदतीने डाळ मंडई येथील एका दुकानावर छापा टाकून सपट कंपनीचे बनावट पाऊच जप्त केले आहेत. याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये सागर मुनोत या दुकानदाराविरुद्ध सपाट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे विक्री व्यवस्थापक अजय मोरे यांनी हि फिर्याद दिली.

कंपनीचे नाव साम्य आणि कंपनीचे नावाचा लोगो वापरून शहारत अजूनही वॉशिंग पावडर,मसाला, आणि मीठ विक्री होत असल्याची खात्रीपूर्वक माहिती आहे. मात्र यासाठी जोपर्यंत कंपनी ठोस पाऊल उचलत नाही तोपर्यंत या वस्तू बनवट आहेत का नाही हे समजू शकत नसल्याने पोलिसांनाही काही मर्यादा येत असतात. त्यामुळे अशा डुप्लिकेट वस्तू बनवून विकणाऱ्यांचं फावते अहमदनगर शहरातील तपोवन रोड भागात सध्या एका बंगल्यात डुप्लिकेट वस्तू बनवण्याचा कारखाना असल्याचे समजतय.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version