मुंबई दि.२० मे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या ५ जूनला अयोध्या दौऱ्याला जाणार होते. मात्र आता राज ठाकरेंच्या अयोध्या दौरा स्थगित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज ठाकरेच्या पायाचं दुखणं वाढलं असून त्यामुळे राज ठाकरेंचा हा दौरा स्थगित झाला आहे. मनसेकडून अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केली गेलेली नाही, मात्र अशा चर्चा सुरू आहेत.
मध्यप्रदेश चा राज ठाकरे यांचा दौरा चांगलाच दम लागला होता कारण भाजपचे खासदार ब्रिज भूषण यांनी राज ठाकरे यांना कडवा विरोध केला होता. तर सध्या मध्यप्रदेश मध्ये ज्ञानव्यापी मशिदीचा मुद्दा चांगलाच तापलेलाआहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा दौरा रद्द होऊ शकतो आणि पुढची तारीख ठरू शकते अशी सूत्रांनी माहिती दिली आहे मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्यापही मिळालेली नाही.