Homeराजकारणअहमदनगर शहराची धुरा पुन्हा एकदा अभय आगरकर यांच्याकडे तर जिल्ह्यातही खांदापालट

अहमदनगर शहराची धुरा पुन्हा एकदा अभय आगरकर यांच्याकडे तर जिल्ह्यातही खांदापालट

advertisement

अहमदनगर दि.१८ जुलै
अहमदनगर शहर भाजप शहर जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात आली असून गेल्या अनेक दिवसांपासून लागलेली उत्सुकता आता संपली आहे अहमदनगर शहरात भाजपचे माजी शहराध्यक्ष एडवोकेट यांच्यावर पुन्हा शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आली असून अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग तर उत्तर जिल्हाध्यक्षपदी विठ्ठलराव लंघे यांच्या नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी दिले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या पदाच्या निवडीबाबत भाजपमध्ये उत्सुकता चांगली गेली होती तीन महिन्यांपूर्वी अहमदनगर शहरात या तीनही पदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या होत्या मात्र निवड जाहीर झाली होती त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती की या पदांवर कोणाची वर्णी लागणार अखेर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी राज्यातील विविध ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर केली असून अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती जाहीर केल्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. भाजपचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी या आधी भाजपच्या शहर अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर जबाबदारी आल्याने आता पक्ष संघटन पुन्हा मजबूत करणे आणि शहरासह उपनगरामध्ये पुन्हा भाजपची ताकद निर्माण करणे आणि येणारी महानगरपालिका लोकसभा निवडणूक आणि राज्यात सध्या बिघडलेली राजकीय समीकरणे यातून शहरात भाजपला पुन्हा नवसंजीवनी देणे असे आव्हान आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular