Home देश सर्वांना पोट धरून हसायला लावणारा कॉमेडीयन राजू श्रीवास्तव बद्दल डॉक्टरांनी दिली...

सर्वांना पोट धरून हसायला लावणारा कॉमेडीयन राजू श्रीवास्तव बद्दल डॉक्टरांनी दिली धक्कादायक माहिती

दिल्ली.१८ ऑगस्ट

प्रसिद्ध कॉमेडियन आणि उत्तर प्रदेश फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष राजू श्रीवास्तव यांचे ब्रेन डेड घोषित करण्यात आले आहे. राजू श्रीवास्तव यांना हदयविकाराचा झटका आल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु, आता त्यांच्याबाबत चिंताजनक बातमी समोर येत आहे. आज सकाळी डॉक्टरांनी राजू यांचा मेंदू काम करत नसल्याची माहिती दिली आहे, असे मुख्य सल्लागार अजित सक्सेना यांनी सांगितले.

राजू श्रीवास्तव यांची 10 ऑगस्ट रोजी प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वर्कआउटच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि ते ट्रेडमिलवरून पडले. त्यांना दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल नऊ दिवसांपासून ते हॉस्पिटलमधील आयसीयुमध्ये बेशुध्दावस्थेत होते. अखेर आज राजू श्रीवास्तव यांचे ब्रेन डेड घोषित करण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version