Home राजकारण राज्यसभा निवडणुकीत भाजपचा पराभव व्हायला हवा असेल तर, महाविकास आघाडीने उघडपणे पाठिंबा...

राज्यसभा निवडणुकीत भाजपचा पराभव व्हायला हवा असेल तर, महाविकास आघाडीने उघडपणे पाठिंबा मागावा: असदुद्दीन ओवेसी

नांदेड दि ७ जून

ओवेसींची आज नांदेडमध्ये बैठक आहे तर लातुरात जाहीर सभा आहे अससदुद्दीन ओवैसी यांची सकाळी ११ वाजता नांदेडमध्ये बैठक होणार आहे. त्यानंतर, संध्याकाळी ६.३० वाजता ओवेसींची जाहीर सभा होणार आहे. त्यापूर्वी ओवैसी यांनी मीडियाशी संवाद साधला. महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्यांनी आमच्याशी संपर्क साधला नाही. राज्यसभेसाठी आमच्याशी कोणीही चर्चा केली नाही. राज्यसभेला कुणाला आमचा पाठिंबा हवा असेल तर त्यांनी आम्हाला जगजाहीर पाठिंबा मागावा. आम्ही पाठिंबा देऊ, असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद मध्ये जाहीर सभा होणार आहे या जाहीर सभेमध्ये अनेक प्रश्नांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हात घालणार असून त्यामध्ये प्रामुख्याने सध्या ज्या गोष्टीवर राजकारण सुरू आहे ते म्हणजे औरंगाबादचे नामांतराचा प्रश्न तसेच अकबरुद्दीन ओवेसी आणि खा. इम्तियाज जलील यांनी औरंगजेबाच्या कबरीचेचे घेतलेले दर्शन यावरून उद्धव ठाकरे आपल्या जाहीर सभेत निशाणा साधण्याची शक्यता आहे. मात्र आता राज्यसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करायचा असेल तर महाविकासआघाडी ने आमच्याशी संपर्क करावा अशी गुगली ओवेसी यांनी टाकल्याने आता शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version