Homeराजकारणविधान परिषद निवडणूक राणी ताई लंके उमेदवारीच्या रिंगणात... आघाडीत बिघाडी की वेगळाच...

विधान परिषद निवडणूक राणी ताई लंके उमेदवारीच्या रिंगणात… आघाडीत बिघाडी की वेगळाच डाव..

advertisement

अहिल्यानगर दिनांक ३१ मे

अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या मैदानात आता राणी निलेश लंके यांची एंट्री होणार असून खासदार नीलेश लंके आता या निवडणुकीत रंग भरणार की काही वेगळी जादू करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Oplus_0

तर दुसरीकडे काँग्रेसकडून दीप चव्हाण आणि करण ससाने या दोघांनाही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता राणी लंके, दीप चव्हाण,करण ससाने या महाविकास आघाडीतील उमेदवार निवडणूक लढवणार की शेवटच्या क्षणी काही वेगळीच जादू करणार याकडे सर्वांचे लक्ष असून की खरोखरच आघाडीत बिघडी झाली आहे याबाबतही आता उलट सुलट चर्चा सुरू आहेत.

तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांचाही उमेदवारी अर्ज दाखल होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष असून भारतीय जनता पार्टी कडून प्राजक्त तनपुरे उमेदवारी अर्ज दाखल करणार की आणखी काही धक्का भाजप देऊ शकते. कारण अद्यापही प्राजक्त तनपुरे यांना कोणत्याही सूचना मिळाल्या नसल्याचे खुद्द त्यांनी चोंडी येथे बोलताना सांगितले आहे. त्यामुळे अर्ज काढण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार कोण राहणार याबाबत प्रश्नचिन्ह राहणार आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular