अहमदनगर दि.६ ऑगस्ट
अहमदनगर शहरातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या रेकॉर्ड रूम वर खाजगी लोकांचा ताबा असून हे खाजगी लोक अव्वाच्या सव्वा रुपये घेऊन नागरिकांना फेरफार आणि इतर कागदपत्र देण्याचे काम करत असल्याचा प्रकार सुरू असून या कडे महसूल विभागच दुर्लक्ष आहे.
विशेष म्हणजे तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या या रेकॉर्ड रूम मध्ये महसूल विभागाचा अधिकारी बसणे आवश्यक असताना या ठिकाणी खाजगी इसम कार्यालय चालवतो आहे.महसूल विभागाचे दोन कर्मचारी येथे नेमणुकीस असतात मात्र इतर कामाच्या जबाबदारीने ते कर्मचारी तहसील ऑफिस मध्ये बसतात मात्र जिल्हा आणि शहारा साठी महत्वाचे असणारे रेकॉर्ड रूम खाजगी ईसमा कडे देणे म्हणजे भविष्यात एखादे रेकॉर्ड गहाळ झाले अथवा एखाद्या रेकॉर्ड मध्ये काही अदलाबदल झाली तर याला जिम्मेदार कोण परत सर्व सामन्या लोकांकडून घेतले जाणारे पैसे नेमके कोणाच्या खिशात जातात आणि या पैशांचे वाटेकरी कोण असा सवाल उपस्थित होतोय . या कर्यालाच्या शेजारीच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय आहे.मग रेकॉर्ड रूम मध्ये खाजगी इसम पैसे घेत असतील तर ते सरकारी अधिकाऱ्यांसाठी घेत असतील असे होते त्या मुळे अशा ठिकाणी लाच लुचपत विभागाची कारवाई होणे गरजेचे आहे.
महसूल मंत्री नगर जिल्ह्याचे असतानाच त्यांच्याच जिल्ह्यात असा प्रकार होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.जर खाजगी इसम कोणत्याही अधिकृत नियुक्ती न होता महत्वाच्या रेकॉर्ड रूम मध्ये काम करून पैसे जमा करत असतील तर याला जिम्मेदार कोण? ( क्रमशः)
पुढे वाचा..
रेकॉर्ड रूम मध्ये काम करणाऱ्या खाजगी इसमाला कोणाचा आशीर्वाद …मलिदा कोणाच्या खिशात