Homeशहरमाहिती अधिकार कायदा एकाच दिवशी नाशिकमध्ये अहमदनगर महानगरपालिकेच्या 20 अपिलांच्या सुनावण्या

माहिती अधिकार कायदा एकाच दिवशी नाशिकमध्ये अहमदनगर महानगरपालिकेच्या 20 अपिलांच्या सुनावण्या

advertisement

अहमदनगर दिनांक 6 डिसेंबर

माहिती अधिकार अंतर्गत एखाद्या नागरिकाने माहिती मागवली तर सर्वसाधारण प्रकरणांत ३० दिवसांत माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र अहमदनगर महानगर पालिकेचे अधिकारी माहिती देत नसल्याने अनेक नागरिकांनी नाशिक येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील केले आहे.आज मंगळवारी अहमदनगर महानगरपालिकेचे जवळपास वीस अपील नाशिक येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सूनवणी साठी ठेवण्यात आले होते अशी माहिती समोर आली आहे. वेळेत माहिती दिली नाही त्यामुळे तीस दिवसानंतर नागरिकांनी नाशिक येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील केल्यानंतर त्याची सूनवणी तिथे सुरू असून एकाच दिवशी महानगरपालिकेचे वीस अपिलांची सुनावणी होणे म्हणजे महानगरपालिकेचा कारभार कसा चालतो याचे उदाहरण समोर येते.

 


अहमदनगर महानगरपालिकेचे उपायुक्त, बांधकाम विभाग प्रमुख, यांच्यासह अनेक खात्यांचे प्रमुख आज नाशिक येथे माहिती अधिकार कायद्या अंतर्गत अपील केलेल्या सूनवणी साठी उपस्थित असल्याची माहिती समोर आली असून एकाच दिवशी 20 अपिलांची सूनवणी होणे म्हणजे महानगरपालिकेचा कारभार कसा चालतो ते समोर आल्यासारखा प्रकार आहे.अपील केल्यामध्ये काही माजी नगरसेवकांचाही समावेश असून नागरिकांना वेळेवर माहिती न दिल्याने अखेर वरिष्ठांकडे धाव घ्यावे लागते माहिती अधिकार कायदा असूनही त्यापासून नागरिकांना वंचित ठेवण्याचा हे काम असल्याचं काही नागरिकांनी बोलून दाखवला आहे.

एखाद्या नागरिकाने अर्ज केल्यानंतर ३० दिवसांत माहिती मिळाली नाही, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील करता येते. दुसरे अपील नव्वद दिवसांच्या आत केंद्रीय माहिती आयोगाकडे करता येते. संबंधित अधिकाऱ्याने विहित मुदतीत माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास त्या अधिकाऱ्याला आर्थिक दंड ठोठावण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आलेली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular