अहमदनगर दि.६ डिसेंबर
अहमदनगर शहरातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयानीय अवस्था झाली असून पावसाळा गेला तरी रस्त्यांची कामे अद्यापही सुरू नाहीत याला कारण म्हणजे निधी कमी असल्याने अनेक रस्त्यांचे कामे सध्या ठप्प झाले आहेत. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनावर या खड्ड्यांमुळे रोजच टीका होत आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे दक्षिणेचे खासदार सुजय विखे पाटील यांनी आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन अहमदनगर शहरातील रस्त्यांच्या कामासाठी 25 कोटी रुपये देण्याची मागणी केली. तसेच नगर शहरातील सावेडी बस स्टँडच्या नूतनीकरणासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर निधी देण्याचे आश्वासन दिले असल्याचं खा.सुजय विखे पाटील सांगितले आहे.यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.
.