HomeUncategorizedडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या शहराध्यक्षपदी सचिन शिंदे यांची नियुक्ती

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या शहराध्यक्षपदी सचिन शिंदे यांची नियुक्ती

advertisement

अहमदनगर दि.६ डिसेंबर

: डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या अहमदनगर शहर अध्यक्षपदी महानगर न्यूजचे संपादक सचिन शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी नुकतेच शिंदे यांना नियुक्तीपत्र देवून सत्कार केला. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष किशोर मरकड, विक्रम बनकर, सचिन कलमदाणे, यतीन कांबळे, सागर म्हस्के, स्नेहा जोशी, विक्रम लोखंडे, मयुर नवगिरे आदी उपस्थित होते.
राजा माने म्हणाले की, संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शिवाजी शिर्के आणि उपाध्यक्ष किशोर मरकड यांनी नगर जिल्ह्यात डिजिटल मिडिया प्रतिनिधींचे मजबूत संघटन उभारले आहे. यातूनच नगर शहराध्यक्षपदी सचिन शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. महानगर न्यूजच्या माध्यमातून त्यांनी मागील पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत ठसा उमटविला आहे. पत्रकारांच्या समस्यांची सोडवणुक करतानाच डिजीटल मिडियात गुणात्मक बदल होण्यासाठी ते निश्चितच भरीव योगदान देतील असा विश्वास माने यांनी व्यक्त केला.

किशोर मरकड म्हणाले की, डिजीटल मिडिया सध्या प्रभावी भूमिका बजावत आहे. ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी संघटनेचे पहिलेच राज्य अधिवेशन महाबळेश्वर जवळील भिलार येथे घेतले. राज्यातील 1200 प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. आता नगर शहराची जबाबदारी शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली असून ते नगरमध्ये चांगले संघटन उभे करतील असा विश्वास आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular