अहमदनगर दि.१७ ऑक्टोबर
नवरात्राचा उत्साह सध्या शिगेला पोहचला आहे नवरात्र घटस्थापना होऊन तीन दिवस झाले असून आता नवरात्र निमित्त गरबा दांडियाचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात येत आहे. मात्र आता या गरबा दांडिया मध्ये सुद्धा समाजा समाजातील वेगळेपण दाखवण्यासाठी फक्त ठराविक समाजालाच या ठिकाणी प्रवेश दिला जाईल अशा पद्धतीने प्रचार सुरू झाला आहे. अहमदनगर शहरातही काही ठिकाणी दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र त्या ठिकाणी फक्त ठराविक समाजाच्या लोकांना प्रवेश मिळेल असे बिनदिक्कतपणे सांगितले जातेय. एरवी समाजा समाजात एकोप्याची भावना निर्माण व्हावी म्हणून एकमेकांना संदेश देणारे लोकच असा फतवा काढत असतील तर समाजातील दुही दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. त्या मुळे एकोपा वाढणार तर नाही मात्र दुरावा निर्माण होऊन दोन समाजात वितुष्ट निर्माण होऊन अनेक गंभीर घटनाही घडू शकतात.
मुलींचा जन्मदर अनेक समाजांमध्ये कमी झाला असल्यामुळे आता अनेक समाज इतर धर्मातील मुलींना आपल्या घरची सून करून घेतात ही खरी परिस्थिती आहे मग त्या ठिकाणी धर्म जात विसरून आपला वंशज वाढवावा यासाठी ही सोयरीक केली जाते मात्र इतर ठिकाणी इतर समाजातील महिला आपल्या समाजात येऊ नये म्हणून फतवा काढला जातो हा कोणता शहाणपणा
नवी मुंबईच्या कामोठे येथे नवरात्रीत निमित्त आयोजित कार्यक्रमात पटेल समाजाशिवाय इतरांना प्रवेश नाकारण्यात आलाय. पटेल समाजाव्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेश नसल्याचे फलक पाहून मनसेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा हाती घेतलाय.मनसे पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी आवाज उठवत आयोजकांची भेट घेतली. आयोजकांची भेट घेऊन त्यांच्याकडून झालेली चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. यावरून आयोजकांनी देखील तातडीने आपला फलक हटवून सर्वांना परवानगी असल्याचा फलक लावला जाणार असल्याचं म्हटलं. तसेच सर्वांची मफीही मागितली आहे.
महाराष्ट्रात राहून मराठी माणसालाच प्रवेश नाकारणाऱ्या लोकांना मनसेने चांगलाच धडा शिकवला आहे. त्यामुळे आता अहमदनगर शहरातही अशा प्रकारे मनसे भूमिका घेणार का? हे पाहावे लागणार आहे समाजात अशा प्रकारामुळे दूही मजण्याचा प्रकार होत असून हा प्रकार वेळेत थांबवणे गरजेचे आहे अन्यथा भविष्या काळात माणूस माणसाला विचारणार नाही अशी वेळ येऊ शकते.