अहमदनगर – दि.३१ मे
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना मुंबईत दुरध्वनीवरून जीवेमारण्याची धमकी देण्यात आली होती .या बाबत पोलिसांनी शोध मोहीम राबवून सायबर सेलची मदत घेऊन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्याला अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातून अटक केली आहे.
नगर तालुका पोलिसांनी आज सकाळी चिंचोडी पाटील येथून भाऊसाहेब रामदास शिंदे यास ताब्यात घेतले असून त्याच न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे तसेच मुंबई येथील पोलिसांचे एक पथक नगरमध्ये दाखल झाले असून के पटके भाऊसाहेब शिंदे यांची चौकशी करू शकते.
तर या प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला भाऊसाहेब शिंदे यांनी खळबळजनक दावा केला असून काही लोकांनी सॅटेलाईट द्वारे माझ्या मेंदूचा ताबा घेतला असून सॅटेलाईट द्वारे माझ्या पत्नीलाही त्रास दिला आहे. या बाबत माझ्या कडे सर्व पुरावे असल्याचा दावा शिंदे करत आहे. याबाबत मी महिला आयोगाकडे तक्रारही दिले आहे मात्र माझ्या तक्रारीची दखल घेत नसल्याने मी हा सर्व खटाटोप केला असून यामुळे आता मला पोलिस संरक्षण मिळाले तर आहेत आणि माझी बाजू मी न्यायालयासमोर मांडू शकेल असेही भाऊसाहेब शिंदे याने सांगितलं आहे.