अहमदनगर दि.५ डिसेंबर –
मुलींची संख्या दिवसेंदिवस कुस्ती क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसत आहे क्रीडा क्षेत्रामधील खेळाडूंसाठी शासकीय नोकरीमध्ये ५ टक्के आरक्षण दिले जात आहे त्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धेतून खेळाडूंना करिअर करण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मुली आता क्रीडा क्षेत्रामध्ये भरारी घेताना दिसत आहे मुलांप्रमाणे मुली ही सर्वच क्षेत्रांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवताना दिसत आहे. ध्येय चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले जाते मुलींनीही आता शालेय शिक्षणाबरोबर शालेय क्रीडा स्पर्धेकडे वळावे जेणेकरून आपल्या आवडत्या खेळामध्ये स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळत असतो असे प्रतिपादन नगरसेविका मीनाताई चव्हाण यांनी केले.
भिस्तबाग चौक येथील संभाजी राजे कुस्ती केंद्रामध्ये मनपा,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय मुलींच्या कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ नगरसेविका सौ.मीनाताई चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सौ.किरण बारस्कर,संगीता चव्हाण, शुभांगी आढाव, श्वेता वाघ, रणवीकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका चितंबर,मनपा शहर अभियंता सुरेश इथापे,कुस्ती केंद्राचे मार्गदर्शक पै. शिवाजी चव्हाण,कुस्ती केंद्राचे अध्यक्ष नितीन आव्हाड,नगर तालुका क्रीडा समितीचे उपाध्यक्ष पै नानासाहेब डोंगरे,इंजि. मनोज पारखी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर शहरातील विविध शाळेच्या मुलींनी शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने भाग घेतला होता या विजेत्या खेळाडूंची विभागीय पातळीवर निवड झाली आहे.