श्रीरामपूर दि२७ एप्रिल
श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील गोदावरी नदीपात्रातून चोरून वाळू वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्या नंतर श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी आपल्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सूचना देऊन नायगाव येथील नदी पत्रात छाप टाकण्यास सांगितले
त्या नुसार पथकाने छापा घालून चोरटी वाळू वाहतूक करताना अनिल सोपान शेलार याचे ताब्यातून एक विटकरी रंगाचा टेम्पो. व १.७० ब्रास वाळू असा एकूण ५,०७०००रुपयांचा मुद्देमाल आणि फारुख ख्वाजा शेख याचे ताब्यातून एक विटकरी रंगाचा टेम्पो. व 1.70 ब्रास वाळू असा एकूण५०७००० 5रुपयांचा मुद्देमाल असा एकूण १०,१४००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

या आरोपी विरुध्द पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ यांचे फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथ भा द वि कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक,मनोज पाटील अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, यांचे मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके, पो. नि. मच्छिंद्र खाडे, हेड कॉन्स्टेबल भारत जाधव, पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ, चांद पठाण, सुनील दिघे आदींनी केली.