Homeशहरनगर मनपा हद्दीतील डीपी रस्त्यांच्या विकास कामांसाठी १५० कोटींचा निधी मंजूर ...

नगर मनपा हद्दीतील डीपी रस्त्यांच्या विकास कामांसाठी १५० कोटींचा निधी मंजूर शहरातील डीपी रस्ता प्रकल्पाच्या फेज १ ला मान्यता – आ.संग्राम जगताप

advertisement

अहमदनगर दि .२६ फेब्रुवारी:
नगर महापालिकेने डीपी रस्त्यांच्या विकास कामांसाठी पाठवलेल्या प्रस्तावातील कामांना राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने शहरातील डीपी रस्त्याच्या प्रकल्पाच्या फेज १ ला मान्यता दिली असून पहिल्या टप्प्यातील १५० कोटींच्या कामांना मंजुरी दिली असून आठ दिवसांत या कामांची निविदा प्रक्रिया सुरु होणार आहे. महाराष्ट्र सुवर्णज्योत नगरोत्थान योजनेतून नगर महापालिकेला प्रथमच डीपी रस्त्यांच्या कामासाठी इतका मोठा निधी मिळाला आहे. राज्य सरकारने नगर शहराच्या विकासाच्या दृष्टीने मोठी भेट दिली आहे. नगर शहरातील डीपी रस्ते प्रशस्त आणि मजबूत होणार असल्याने विकासाला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया आ.संग्राम जगताप यांनी दिली आहे.

यावेळी आमदार संग्राम बोलताना पुढे म्हणाले की, यापूर्वी नगर शहरातील कोठी रोड, बालिकाश्रम रोड, टिळक रोड, स्वस्तिकचौक ते आनंदऋषीजी महाराज समाधीस्थळ रस्ता, छ. शिवाजी महाराज चौक ते शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिर मिरवणूक मार्ग रस्ता, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, केडगाव देवी रस्ता, केडगाव लिंक रोड, पुना महामार्ग ते कल्याण महामार्गापर्यंत, केडगाव अर्चना हॉटेल ते नेप्ती बाजार समिती रस्ता, महेश टॉकीज रस्ता, तारकपूर ते राधाबाई काळे महिला कॉलेज, सराफ बाजार रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून शहरात टप्य्याटप्प्याने डीपी रस्त्याची कामे मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आ.संग्राम जगताप यांच्या निर्देशानुसार महापालिका हद्दीतील डीपी रस्त्यांसाठी महापालिकेने प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने आ.जगताप यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. नगर शहरातील डीपी रस्ते प्राधान्यक्रमाने होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने त्यांनी मंत्रालय पातळीवर कायम संपर्कात राहून नगर शहरातील भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण कामाची मुहूर्तमेढ रोवली आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सहकार्य लाभले. नगर मनपा हद्दीतील डीपी रस्त्यांचा विकास निधी अभावी रखडलेला आहे. परिणामी शहराचा विस्तार, विकासात अडथळे निर्माण होतात. चांगले रस्ते हे शहराची जीवनवाहिनी असतात. दळणवळण प्रशस्त झाले तर विकास आराखड्याची नियोजनपूर्वक अंमलबजावणी शक्य होते. नवीन वसाहती निर्माण होतात. मुख्य रस्त्यांभोवती बाजारपेठ उभी राहते. पर्यायाने शहराच्या अर्थकारणाला चालना मिळते. याच गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित करीत आ.जगताप यांनी राज्य शासनाकडून डीपी रस्त्यांसाठी आतापर्यंतचा सर्वाधिक निधी खेचून आणण्यात यश मिळवले आहे.

चौकट
विकासाचा मार्ग प्रशस्त झाला…

नगर शहरातील रस्त्यांच्या प्रश्नांबाबत सतत ओरड होते. परंतु, प्रश्न सोडवण्यासाठी चिकाटी आणि पाठपुरावा हवा असतो. मनपाच्या तिजोरीत कायम खडखडाट असतो. त्यामुळे डीपी रस्त्यांची कामे करायची तर शासनाच्या निधीशिवाय पर्याय नाही. तो मिळवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यापासून शासन दरबारी प्रस्ताव मंजूरीसाठी कायम दक्ष रहावे लागते. आ.जगताप यांनी हेच काम अतिशय प्रभावीपणे करून शहराच्या विकासाचा मार्ग अधिक प्रशस्त केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ..

आ.संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी पक्षात नेहमीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक कायम ठेवली आहे. मधल्या काळात झालेल्या पक्षांतर्गत राजकारणावेळीही त्यांनी अजितदादांबरोबरच राहणे महत्वाचे मानले. यात राजकारणापेक्षा शहर विकासाचे दीर्घकालीन उद्दिष्ट होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपले विश्वासू असलेल्या आ.जगताप यांना विकासासाठी सहकार्य करीत नगर मनपा हद्दीतील डीपी रस्त्यांच्या मंजूरीसाठी विशेष प्रयत्न केले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular