HomeUncategorizedअजय उर्फ खंडू बारस्करचा सावेडी ग्रामस्थांच्या वतीने निषेध.. सावेडी गाव मनोज जरांगे...

अजय उर्फ खंडू बारस्करचा सावेडी ग्रामस्थांच्या वतीने निषेध.. सावेडी गाव मनोज जरांगे यांच्या पाठीशी…

advertisement

अहमदनगर दि.२५ फेब्रुवारी
अहमदनगर शहरातील सावेडी गावठाण परिसरातील ग्रामस्थांनी बैठक घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय बारस्कर याचा सर्वानुमते सावेडी गावाच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच त्याच्या वक्तव्याला सावेडी ग्रामस्थांचे अजिबात समर्थन नाही असा एकमताने निर्णय घेण्यात आला.

मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणारा अजय बारस्कर हा सावेडी गाव परिसरात राहत आहे. जेव्हापासून मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोपाचे सत्र सुरू केले आहे. तेव्हापासून अहमदनगर शहरासह बारस्कर राहत असलेल्या परिसरातील नागरिकांनी या प्रकाराचा निषेध नोंदवाला. संपूर्ण सावेडी गावातील मराठा बांधव हे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे असून त्यांनी उभारलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या लढाईला सदैव साथ देणार असल्याचेही यावेळी ग्रामस्थांनी ठराव केला. नगर शहरात महाराज म्हणून वावरात असलेला हा अजय बारस्कर सावेडी गावठाण परिसरात राहत असल्यामुळ सावेडी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत अजय महाराज बारस्कर याचा निषेध केला आहे. गावातील ग्रामस्थांचा कोणत्याही प्रकारे अजय बारस्कर याच्या वक्तव्यांना पाठींबा नसून त्याचा आम्ही निषेध करत असल्याचे पत्र अहमदनगर येथील मराठा क्रांती मोर्चा यांना दिले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular