Home Uncategorized राष्ट्पतीपदासाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्या शिवसेना खासदाराची पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या...

राष्ट्पतीपदासाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्या शिवसेना खासदाराची पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कडे पत्राद्वारे मागणी

मुंबई दि.५ जुलै
शिवसेनेच्या आमदारांच्या बंडा नंतर आता शिवसेनेच्या खासदारांना भजाप जवळची वाटू लागली आहे .देशात सध्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक लागली असून त्यासाठी भारतीय जनता पार्टी कडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे.

आदिवासी समाजातील सक्षम आणि कतृत्त्ववान महिला म्हणून शिवसेनेने भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी लेखी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कडे एक पत्र देऊन केली आहे .
काय आहे पत्रात पाहूया

दिनांक १८ जूलै, २०२२ रोजी देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. या पदासाठी मा. श्री. यशवंत सिन्हा आणि मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू हे दोन उमेदवार उभे आहेत. मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू ह्या आदिवाशी समाजातील असून सामाजिक क्षेत्रात त्यांचे बहुमुल्य योगदान आहे. मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू ह्या राज्याच्या राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी शिक्षिका म्हणून सुरूवात केली व त्यानंतर अरोबिंदो इंटीग्रल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टीट्यूट, रायंगपूर येथे
सहाय्यक प्रबंधक म्हणून कामगिरी बजावली आहे. या नंतर त्या ओडीसा सरकारच्या सिंचन विभागात कनिष्ठ सहायक या पदावर कार्यरत होत्या. मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडच्या राज्यपाल म्हणून महत्वाची कामगिरी सुध्दा पार पाडलेली आहे. वंदनीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना-भाजप युती असताना
एन.डी.ए. च्या उमेदवाराला पाठिंबा न दर्शविता मा. श्रीमती प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्रातील असल्याकारणाने त्यांना पाठिंबा दर्शविला होता. तसेच मा. श्री. प्रणव मुखर्जी यांना देखील वंदनीय शिवसेनाप्रमुखांनी पाठिंबा दिला होता. मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू ह्यांची पार्श्वभूमी व सामाजिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेता माझी आपणास नम्र विनंती आहे की, आपण मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा व तसे आदेश सर्व शिवसेनेच्या खासदारांना द्यावेत.

असा पत्राचा मजकूर असून आमदारांच्या बंडा नंतर आता भारतीय जनता पार्टीच्या खासदारांना भाजप जवळची वाटू लागली आहे आणि शिवसेनेने याआधी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत बजावलेल्या भूमिकेबाबतही उद्धव ठाकरे यांना आठवण करून देण्यात आली असल्यामुळे आता उद्धव ठाकरे राष्ट्रपती निवडणुकीमध्ये काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version