Home राजकारण शिंदे गटाने ठोकला शिवसेनेच्या अध्यक्षपदावर दावा धनुष्यबाणाचा निर्णय उद्या तरी होणार का?

शिंदे गटाने ठोकला शिवसेनेच्या अध्यक्षपदावर दावा धनुष्यबाणाचा निर्णय उद्या तरी होणार का?

.दिल्ली दिनांक ६ ऑक्टोबर

धनुष्यबाण नेमका कोणाचा याबाबत ही लढाई आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात असून निवडणूक आयोग उद्या काय निर्णय देतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. शिवसेना कोणाची याबाबत सध्या वाद न्यायालयात असला तरी न्यायालयाने निवडणूक आयोगाला निवडणूक चिन्ह बाबत निर्णय घेऊ शकता असे निर्देश दिले होते त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष उद्याच्या निवडणूक आयोगाच्या होणाऱ्या निर्णयाकडे लागले आहे.

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री शिंदे गट या दोन दोघांनाही आपापली कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत दिली होती मात्र शून्य गटाने आपली सर्व कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सपोर्ट केले आहे मात्र उद्धव ठाकरे गट निवडणूक आयोगाकडे कागदपत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे पाहूयात शिंदे गटाने केलेल्या कागदपत्रात नेमकं काय आहे

शिंदे गट – विधानसभा आमदार 40,लोकसभा खासदार 12,प्राथमिक सदस्य 1,66,764 00 पदाधिकारी 144 राज्य प्रभारी 11 अशी लेखी माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे मात्र उद्धव ठाकरे गटाने आद्यपही कोणतीही माहिती दिली नसल्याने उद्धव ठाकरे घराकडे सध्या शून्य इतकी संख्या असल्याची नोंद निवडणूक आयोगाकडे आहे.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने आता थेट शिवसेनेच्या अध्यक्षपदावर आपला दावा ठोकला असल्याची माहिती समोर येत आहे मात्र आता जोपर्यंत निवडणूक आयोग पक्ष चिन्ह बाबत निर्णय देत नाही तोपर्यंत पुढील गणित ही अधांतरीच राहणार आहेत.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version