अहमदनगर दि.१३ ऑक्टोबर
नगर शहरात छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या जाहिरातीचे बॅनर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग पथकाने काढून टाकले होते गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अतिक्रमण पथकाच्या कर्मचाऱ्यांनी हे बोट काढताना छत्रपती शिवाजी महाराजांची बोर्डाची विटंबना केल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे शहराध्यक्ष दिलीप सातपुते यांनी केला आहे याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेना नेते अनिल शिंदे, दिलीप सातपुते भाजपचे शहराध्यक्ष अभय आगरकर बजरंग दलाचे शहर संघटक कुणाल भंडारी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बोर्डाची विटंबना करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी तोफखाना पोलिसांकडे केली आहे.