Homeशहरमराठा समाजाची दिशाभूल करणाऱ्या नगररचना विभागाचे प्रमुख राम चारठाणकर यांचे सर्व अधिकार...

मराठा समाजाची दिशाभूल करणाऱ्या नगररचना विभागाचे प्रमुख राम चारठाणकर यांचे सर्व अधिकार गोठवले…

advertisement

अहमदनगर दि.१३ ऑक्टोबर

वारुळाचा मारुती परिसरात मराठा समाजाला बाहेरून येणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय आणि अभ्यासिका उभारण्यासाठी जागा मिळावी अशी मागणी महानगरपालिकेकडे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र या अर्जावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने अनेक वर्षापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. मागील महिन्यात झालेल्या महासभेमध्ये हा विषय चर्चेला आला आणि सर्वच नगरसेवकांनी याबाबत महानगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले होते यावेळी महानगरपालिकेचे नगररचना विभागाचे प्रमुख राम चारठाणकर यांनी दिलेल्या गोलमाल उत्तरामुळे सर्वपक्षीय नगरसेवक संतप्त झाले होते.

मराठा समाजाला आणि माळी समाजाला जागा देणे बाबतचा ठराव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी आला असताना याबाबत मंत्रालय स्तरावरून काही तांत्रिक गोष्टी दुरुस्त करून आणाव्या लागतील यासाठी अनेक दिवसांपासून हा प्रस्ताव धूळ खात पडून होता. मात्र मंत्रालया कडे प्रस्ताव पाठवला का नाही याबाबत उत्तर देताना नगररचना विभाग प्रमुख गोंधळून गेले होते. अनेक नगरसेवकांनी मंत्रालयात पाठवण्यात आलेल्या कागदपत्रांचा जावक नंबरची मागणी केल्यानंतर जावक नंबर देण्यातही नगररचना विभाग असमर्थ ठरले होते.त्यामुळे हा प्रकार नगरसेवकांच्या निदर्शनास आल्यानंतर सर्वच नगरसेवकांनी याबाबत तीव्र निषेध नोंदवला होता या प्रकरणावरून महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गोंधळ झाला होता.

नगर रचना विभागाचे प्रमुख राम चारठणकर हे अनेक वेळा गैरहजर राहून घरूनच कामाचा गाडा हाकलत होते अशी तक्रार अनेक वेळा नागरिकांकडून आणि नगरसेवकांकडून होत होती अनेक प्रकरणात चारठाणकर यांच्या बद्दल तक्रारी वाढत गेल्याने आणि मराठा समाजाची दिशाभूल केल्याने अखेर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी नगर रचना विभागाचे प्रमुख राम चारठाणकर यांचे सर्व अधिकार गठित केले आहेत तर त्यांच्या जागी सर्वेश चापळे यांना कामाचे अधिकार देण्यात आले आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular