Homeशहरराज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश...

राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना प्रदान

advertisement

नगर दिनांक 25 जानेवारी

शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था, नाशिक या राष्ट्रीय उपक्रमशील संस्थेच्या मार्फत सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उदयोजक, राजकीय व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक कृतज्ञता म्हणुन राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार सन 1998 पासुन देण्यात येत आहे.

2023-2024 वर्षाचा राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार संस्थेच्या वतीने या वर्षी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जाहीर करण्यात आला. संस्थेमार्फत शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान सोहळा आज नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदीर येथे आयोजित करण्यात आला होता

शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रमस माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. 2023-2024 वर्षाचा राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार नाशिक परिक्षेत्राचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ.बी.जी.शेखर पाटील तसेच वीरपत्नी सन्मा.हर्षदाताई खैरनार यांचे शुभहस्ते पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना प्रदान करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रविंद्र जाधव, संतोष मराठे हे उपस्थित होते.

पुरस्कार प्रदान सोहळयामध्ये पुरस्कार स्विकारून पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच पुरस्कार प्रदान करून सन्मानीत केलेबाबत शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular