Home राजकारण शिवसेनेला आणखी एक मोठा झटका या नेत्याने दिला नेतेपदाचा राजीनामा

शिवसेनेला आणखी एक मोठा झटका या नेत्याने दिला नेतेपदाचा राजीनामा

अमरावती दि.६ जुलै
शिवसेनेत धक्य्यांची मालिका संपता संपेना अमरावतीचे माजी खासदार आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी आपल्या नेते पदाचा राजीनामा दिला आहे. ईडी चौकशी प्रकरणात आणि आपल्या आजारपणाच्या काळात ठाकरे कुटुंबियांनी साधी आपली चौकशी केली नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी आपल्या नेतेपदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेला जोरदार हादरे बसले आहेत. त्यातच आता माजी खासदार अडसूळ यांनीही बंडाचं निशाण फडकवल्याने उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली आहे.

आनंदराव अडसूळ शिवसेनेसाठी एक महत्वाचे नेते असून ते सध्या ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. गेल्या काही दिवसात त्यांची अनेकदा ईडी चौकशी झाली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी आनंदराव अडसूळ यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकला होता. त्यादरम्यान, ईडीने त्यांची चौकशी केली असून त्यांच्या घरातून कागदपत्रे, मोबाईल आणि लॅपटाॅप जप्त केले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version