Home राजकारण शिवसेना पक्षाच्या महानगरप्रमुख पदी दिलीप सातपुते यांची निवड

शिवसेना पक्षाच्या महानगरप्रमुख पदी दिलीप सातपुते यांची निवड

अहमदनगर दि.२३ ऑगस्ट

शिवसेनेतून वेगळा गट तयार करून सत्ते मध्ये आलेल्या एकनाथ शिंदे गटाने आता संघटनेमध्ये फेरबदल करण्यास सुरुवात केली असून विविध पदांच्या नियुक्ती बाबत सध्या घोषणा करण्यात येत आहेत. अहमदनगरच्या शिवसेनेच्या महानगर प्रमुख पदी माजी नगरसेवक दिलीप सातपुते यांची निवड करण्यात आली असल्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या सहीने नियुक्ती करण्यात आली आहे.

यामुळे शहराच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.कारण नियुक्ती पत्रामध्ये शिवसेना पक्षाच्या महानगर प्रमुख पदी निवड असे शब्द असल्याने आणि सध्या शिवसेना कोणाची याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून दोन्ही गटाने शिवसेना आमचीच हा पवित्त्रा घेतला आहे. त्यामुळे या नियुक्ती होताना शिवसेना या नावाने नियुक्ती होत असल्याने एक संभ्रमाचे वातावरण तयार होत आहे.

काय आहे नियुक्ती पत्रकात पहा

सस्नेह जय महाराष्ट्र
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना
मुख्य नेते माननिय श्री. एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार
आपली, शिवसेना पक्षाच्या महानगरप्रमुख पदी (कार्यक्षेत्रनगर शहर) नियुक्ती करण्यात
येत आहे.
सदर नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार
आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि
प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा
विश्वास आहे.
शुभेच्छांसह
जय हिंद जय महाराष्ट्र!
आपला
संजय मोरे
शिवसेना सचिव

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version