Home राजकारण अखेर भाऊ कोरगावकर यांना पदावरून हटवले शिवसेनेचे नगर जिल्हा संपर्कप्रमुख जाहीर

अखेर भाऊ कोरगावकर यांना पदावरून हटवले शिवसेनेचे नगर जिल्हा संपर्कप्रमुख जाहीर

मुंबई, दि. ३१ जुलै
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने
नगर जिल्ह्याकरिता जिल्हा संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांनी पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे. अहमदनगर दक्षिण जिल्ह्यासाठी आमदार सुनील शिंदे (नगर जिल्हा), बबनराव घोलप (शिर्डी लोकसभा). यांची नियुक्ती जाहीर झाली असून गेल्या अनेक दिवसांपासून नगर दक्षिण जिल्ह्यातील संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांना हटवण्यासाठी अनेक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती.

मागील विधानसभा निवडणुकीनंतर संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर आणि शहरातील काही नगरसेवक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होते मात्र शेवटपर्यंत भाऊ कोरगावकर हे आमच्यामध्ये कोणतेही वाद नसल्याचे सांगत असतानाच त्यांच्या जागेवर आता आमदार सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version