Home राजकारण बंडखोरांना पाठिंबा देणाऱ्यांची उचलबांगडी नवीन कार्यकर्त्यांना संधी शिवसेना एक्शनमोड मध्ये

बंडखोरांना पाठिंबा देणाऱ्यांची उचलबांगडी नवीन कार्यकर्त्यांना संधी शिवसेना एक्शनमोड मध्ये

रायगड दि.२६ जून
एकनाथ शिंदे यांच्‍या बंडाला चार दिवस उलटून गेले आहेत. शिवसेनेतही आता जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. रायगड जिल्‍हयातही राजकीय घडामोडींना वेग आलाय. जुने निष्‍ठांवत शिवसैनिक पुन्‍हा एकदा सक्रीय झाले आहेत. बंडखोर गटातील पदाधिकारयांची उचलबांगडी करण्‍यात आली असून तेथे नवीन पदाधिकारयांच्‍या नियुक्‍त्‍या करण्‍यात आल्‍या आहेत


बंडखोर गटाला शह देण्‍यासाठी शिवसेनेतील जुन्‍या निष्‍ठावंत शिवसैनिकांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणूकीनंतर विजनवासात गेलेले माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते हे देखील सक्रीय झाले असून त्‍यांनी पनवेल इथं रणशिंग फुंकून कोकणचा दौरा सुरू केला आहे. बंडखोरांना कुठल्‍याही परीस्थितीत पराभूत करणार असा निर्धार त्‍यांनी बोलून दाखवला. आता नवीन पदाधिकारयांची नियुक्‍ती करून बंडखोरांना शह देण्‍याची रणनिती आखली आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version