Home राजकारण शिवसेना (शिंदेगट) जिल्हा नूतन कार्यकारिणी जाहीर, मात्र नियुक्ती पत्रावरची ही “बाब” अली...

शिवसेना (शिंदेगट) जिल्हा नूतन कार्यकारिणी जाहीर, मात्र नियुक्ती पत्रावरची ही “बाब” अली का लक्षात

अहमदनगर दि.२३ ऑगस्ट

शिवसेनेत सध्या उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्या कडून पदाधिकारी निवडीसाठी जोरदार रस्सीखेच चालू आहे. यामुळे अनेक शिवसैनिक सध्या उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाकडे जात असल्याचे चित्र मुंबईमध्ये पाहायला मिळतय. अहमदनगर शहरातही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, माजी नगरसेवक दिलीप सातपुते, सचिन जाधव, नगरसेवक सुभाष लोंढे, भिंगार मधील सुनील लालबेंद्रे, यांचे सहकारी पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची मुंबई ते भेट घेतली होती.

या सर्व आजी-माजी नगरसेवकांना आता पदाचे वाटप करण्यात आले असून अहमदनगर शिवसेना जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख पदी अनिल शिंदे, शहर प्रमुख पदी दिलीप सातपुते, भिंगारशहर प्रमुख पदी सुनील लालबेंद्रे,उपजिल्हाप्रमुख पदी पैलवान सुभाष लोंढे आणि जिल्हा संपर्कप्रमुख पदी सचिन जाधव यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र शिवसेना सचिव संजय मोरे यांनी दिले आहेत. मात्र या नियुक्ती पत्रावर बारा ऑगस्ट 2022 अशी तारीख आहे मात्र नियुक्ती घोषणा आज म्हणजेच 23 ऑगस्टला करण्यात आली आहे.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version