Home राजकारण शिवसेनेला अजून एक मोठा धक्का उपराष्ट्रपती पदाच्या पाठिंब्यावरून आता खासदार वेगळी भूमिका...

शिवसेनेला अजून एक मोठा धक्का उपराष्ट्रपती पदाच्या पाठिंब्यावरून आता खासदार वेगळी भूमिका घेणार

दिल्ली – १८ जुलै
राज्यातील शिवसेनेच्या ४० आमदारांपाठोपाठ आता १४ खासदारही बंडखोरीच्या तयारीत आहेत राष्ट्रपतिपदासाठीचे मतदान होताच एक मोठा गट सेनेतून बाहेर पडल्याची घोषणा करणार असल्याची माहिती मिळत असून या गटाच्या मुख्य प्रतोदपदी खासदार भावना गवळी यांची नियुक्ती करण्यात येणार आल्याच खात्रीलायक वृत्त आहे. यामुळे सोमवारी अथवा मंगळवारी राज्याच्या राजकारणात आणखी एक राजकीय भूकंप होणार आहे.


राष्ट्रपती पदासाठी इंडियन उभा केलेल्या द्रोपदी मुर्म यांना पाठिंबा द्यावा यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन एक मुखी मागणी केली होती मात्र आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने यूपीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याचं खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले आहे त्या मुळे खासदार नाराज असल्याची माहिती मिळत आहे .

भावना गवळी आणि संजय मंडलिक यांनी उघडपणे बंडाची भाषा केली. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे शिंदे गटात जात असल्याचे त्यांनी जाहीर केल आहे. या दोघांच्या या भूमिकेमुळे इतर खासदारही आता शिवसेनेपासून वेगळा गट निर्माण करण्याच्या मानसिकतेत आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version