अहमदनगर दि. 26 जुलै
अहमदनगर शहरातील एका राजकीय पुढाऱ्याला ताब्यात घेण्यासाठी सातारा पोलीस नगर मध्ये दाखल झाल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली आहे. सातारा जिल्ह्यातील एका राजकीय नेत्याच्या साखर कारखान्याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून त्याच्या तपासासाठी सातारा पोलीस नगर मध्ये दाखल झाल्याची माहिती समजते. नगर शहरातील मातब्बर अशा राजकीय पुढाऱ्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस आली असून सध्या पोलीस त्या राजकीय पदाधिकाऱ्याच्या घरी पोहोचली आहे अशी माहिती समजतेय.
या फसवणुकीच्या गुन्ह्याबाबत पोलीस तपास करण्यासाठी आली आहे का? किंवा याप्रकरणी त्या पदाधिकाऱ्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस नगर शहरात दाखल झाली ही माहिती मिळाली नसली तरी पोलिसांचा मोठा फौज फाटा सध्या त्या पदाधिकाच्या घरी गेला आहे.