HomeUncategorizedअहमदनगर शहरातून वाहणाऱ्या सिना नदीत सोडले हजारो लिटर केमिकल... केमिकल सोडल्याने नागरिकांना...

अहमदनगर शहरातून वाहणाऱ्या सिना नदीत सोडले हजारो लिटर केमिकल… केमिकल सोडल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास सीना नदी लगतच्या परिसराचे वातावरण प्रदूषित..

advertisement

अहमदनगर दि.११ नोव्हेंबर
अहमदनगर शहरा लगत असलेल्या सीना नदी मध्ये रात्री कोणीतरी केमिकल सोडल्याने धर्माधिकारी मळा परिसरामध्ये अचानक नागरिकांना त्रास जाणू लागला होता पाऊस ढगाळ वातावरण आणि केमिकल सोडल्यामुळे श्वसनासाठी होणारा त्रास आणि डोळ्यांना होणारी चुनचुन यामुळे नागरिक त्रस्त झाले होते आणि शेकडो नागरिक रस्त्यावर येऊन नेमका हा प्रकार काय याची माहिती घेत होते रात्री उशिरा
या ठिकाणी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर नगरसेवक अनिल बोरुडे आमदार संग्राम जगताप यांचे स्वीय सहायक,सुहास शिरसाठ पुष्कर कुलकर्णी यांनी
या ठिकाणी धाव घेत तातडीने अहमदनगर महानगरपालिका तसेच आपत्ती व्यवस्थापन यांना कळवून याची माहिती दिली महानगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी या परिसरात पातळीने आली होती मात्र पाणी वाहत असल्याने या पाण्यात अग्निशामक दलाच्या गाडीने पाणी मारल्यास याचा वास पुन्हा उघड होईल त्यामुळे पाणी मारण्यात आली नाही तर रात्री उशिरा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी तातडीने यंत्रणा फिरवत नाय तहसीलदार तलाठी तसेच एमआयडीसी मधील सन फार्मा कंपनीचा इंजिनिअरच्या एका पथकाला या ठिकाणी पाठवले होते कोणीतरी खोडसाळपणा करत सीना नदीमध्ये केमिकल सोडल्याने हा त्रास जाणवत होता हा त्रास नंतर नदी काठच्या सर्वच परिसरात रात्री जाणवत होता

मात्र ज्यांनी हा खोडसाळपणा केला आहे त्याचा तपास घेऊन अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. कारण सीना नदी लगतच्या परिसरामध्ये असलेल्या शेतामध्ये हेच पाणी शेतीला वापरले जाते तसेच पाळीव प्राणी आणि जनवारे यांनी जर हे पाणी पिले तर त्यांच्या जीवालाही या केमिकल मुळे हानी होऊ शकते त्यामुळे या घटनेचा तपास करून केमिकल सोडणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular