Homeजिल्हासोशल मीडियावरील अफवा आणि खोट्या आकड्यांमुळे उत्साही कार्यकर्त्यांनी वाटले पेढे..... नगर दक्षिण...

सोशल मीडियावरील अफवा आणि खोट्या आकड्यांमुळे उत्साही कार्यकर्त्यांनी वाटले पेढे….. नगर दक्षिण जिल्ह्यात मतमोजणी दिवशी अफवांचे पीक..केंद्रीय सुरक्षा यंत्रणेने सुरक्षेचा बाऊ पत्रकारांचे मोबाईल फोन बाहेर आणि कार्यकर्त्यांचे मोबाईल फोन मतदान केंद्रात

advertisement

अहमदनगर दिनांक ५ जून
अहमदनगर लोकसभेची निवडणूक एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोडाऊन मध्ये चार जून रोजी सकाळी आठ वाजेपासून सुरुवात झाली मात्र या निवडणुकीची मतमोजणी संथ गतीने होत असल्यामुळे मतदानाचा खरे निकाल लवकर समजत नव्हते मात्र हे बाहेर बसलेल्या कार्यकर्त्यांना लक्षात येत नसल्यामुळे काही कार्यकर्ते आपल्या उमेदवाराच्या मताधिक्याचा मेसेज टाईप करून तो सोशल मीडियावर व्हायरल करून सोशल मीडियावर अनेक अफवा पसवरल्या गेल्या या अफवांमुळे काही ठिकाणी अति उत्साही कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत फटाके फोडत पेढे वाटले मात्र जेव्हा आपला उमेदवार मागे पडला आहे असे कळतात कार्यकर्त्यांचे चेहरे हिरमुसले झाले.

सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरुवात झाली प्रथम टपाली मते मोजण्यात आली आणि त्यानंतर ईव्हीएम मागवले गेले मात्र बाहेर बसलेल्या कार्यकर्त्यांना आपल्या उमेदवाराच्या मताधिक्याच्या आकड्या बाबत असलेली उत्सुकता आणि त्यामुळे सोशल मीडियावर येणारे मेसेज जसेच्या तसे पुढे फॉरवर्ड केल्यामुळे शहरात पसरत गेलेली अफवा यामुळे चांगला गोंधळ उडाला होता. सुरुवातीला पहिल्या सहा फेऱ्यांपर्यंत महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील हे फक्त आठ ते नऊ हजारांच्या मताधिक्याने पुढे होते मात्र सोशल मीडियावर सुजय विखे पाटील हे दीड लाख मतांनी पुढे असल्याचे मेसेज व्हायरल होत गेले आणि काही कार्यकर्ते उत्साहाच्या भरात पेढेही वाटू लागले होते अशी चर्चा असून ज्या ठिकाणी लाखभर मते ही मोजले गेली नव्हती त्या ठिकाणी सोशल मीडियावर लाखोंचा लीड आपल्या नेत्यांना देऊन उत्साही कार्यकर्ते ते मेसेज पुढे ढकलत होती.

अहमदनगर दक्षिण लोकसभेचा पहिला फेरीचा निकाल दुपारी 11 नंतर अधिकृतरित्या बाहेर आला आणि त्यावेळी 400 ते 500 मतांनी महायुतीचे उमेदवार आघाडीवर होते तर सहाव्या फेरीपर्यंत महायुतीचे उमेदवार 9 ते 12 हजारांच्या आसपास आघाडीवर होते मात्र सहाव्या फेरीनंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दहा हजारांची जी आघाडी घेतली ती आघाडी शेवटपर्यंत 28 हजारापर्यंत गेली मात्र शेवटच्या फेरीपर्यंत 28 हजाराच्या पुढे कोणत्याही उमेदवाराने आघाडी घेतली नसतानाही सोशल मीडियावर लाखोंच्या लीडने उमेदवार पुढे असल्याचे मेसेज व्हायरल होत होते. त्याचप्रमाणे रात्री उशिरा मतमोजणी संपल्यानंतर पुन्हा री काउंटिंग होणार असे मेसेज व्हायरल झाले आणि या रिकाऊंटिंग मध्ये महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे मेसेजही व्हायरल झाल्यामुळे याबाबत विचारणा करण्यासाठी अनेक पत्रकारांना फोन आले होते मात्र या सर्व अफवाच ठरल्या सकाळी आठ वाजता सुरू झालेली मतमोजणी रात्री दहा वाजता बरोबर संपली आणि त्यानंतर विजयी उमेदवाराला प्रमाणपत्र देण्यात आले.

यावर्षी प्रशासनाचा ढीसाळ कारभार आणि त्यामुळे पत्रकारांच्या झालेली गैरसोय ही एक ठळक गोष्ट म्हणता येईल अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे मतमोजणी केंद्र आणि मीडिया सेंटर यामधील अंतर आणि मीडिया सेंटर मधून मतमोजणी केंद्रात जात असताना होणारी तपासणी यामध्येच मोठा वेळ जात होता प्रत्येक वेळी नाव नोंदवून आय कार्ड दाखवून संपूर्ण तपासणी करून पत्रकारांना मतदान केंद्रात सोडवण्यासाठी साठी जिल्हा माहिती अधिकारी येत असत विशेष म्हणजे पत्रकारांचे मोबाईल मतदान केंद्रात जाऊ दिले जात नव्हते मात्र काही कार्यकर्त्यांकडे मतदान केंद्रात मोबाईल होते ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. पत्रकारांचे काम हे जनतेपर्यंत खरी माहिती पोहोचण्यासाठी असते मात्र तपासणीच्या नावाखाली दिवसभर पत्रकारांना ताटकळत उभा ठेवणे आणि मोबाईल पासून वंचित ठेवून मतदान केंद्रात पाठवणे याबाबत प्रशासनाचा सर्व पत्रकारांनी निषेध केला मात्र यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हे पत्रकारांच्या मदतीला धावून आल्यामुळे काही काळ का होईना पत्रकारांना मतदान केंद्रांमध्ये सुरळीतपणे सोडण्यात आले होते मात्र केंद्रीय सुरक्षा यंत्रणेने सुरक्षेचा एवढा बाऊ केला होता की पत्रकारांना तपासणीशिवाय ते जाऊ देत नव्हते मात्र मतदान केंद्रात कार्यकर्त्यांकडे मोबाईल कुठून आली हा एक प्रश्न अनुत्तरितच राहिला.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular