परभणी दिनांक 27 मार्च
परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १.५ लाख रुपयांची लाच घेताना अटक केली.स्विमिंग पूल बांधण्याच्या मंजुरीसाठी तिने ही लाच मागितली होती.
परभणी जिल्ह्यातील एसीबी विभागाची ही एक मोठी कारवाई आहे. स्विमिंग पूल बांधण्याच्या परवानगीसाठी कविता नावंदे यांनी २.५ लाख रुपयांची लाच मागितली होती. यापैकी परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना दीड लाख रुपये घेताना पकडण्यात आले आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंडे यांना लाच घेताना पकडण्यात आल्यानंतर या घटनेने परभणी जिल्ह्यातील क्रीडा विभागात खळबळ उडाली आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी क्रीडा स्पर्धेच्या बिलाच्या मंजुरीसाठी आणि स्विमिंग पूल बांधण्यासाठी संबंधितांकडून लाच मागितली होती. . परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आर्थिक गैरव्यवहाराचा आणि सरकारची दिशाभूल केल्याचा ठपका असलेल्या औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश राज्यपालांच्या मार्फत ६ ऑक्टोबर २०२१ रोजी देण्यात आले होते. त्या आदेशानुसार नावंदे यांची औरंगाबाद प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती.
जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांची सातारा येथील २०१२ मधील प्रकरणापासून आणि अहमदनगर येथील २०१८-१९ तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी असताना नावंदे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यावेळेस त्यांची क्रीडा विभागाच्या विविध खात्यांतर्गत चौकशी करण्यात आली होती.
कविता नावंदे या अहमदनगर जिल्ह्याच्या क्रीडा अधिकारी असताना विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या होत्या त्यांच्या निर्णयामुळे अनेक क्रीडा संघटनांनी त्यांच्याविरुद्ध आंदोलन पुकारले होते रस्ता रोको करण्यात आला होता. नगर मधून त्यांची बदली व्हावी याकरिता त्यांच्या बदलीसाठी नगरमधील बहुतांशी क्रीडा संघटनांनी आंदोलन केले होते.त्यावेळी त्यांच्या बदलीसाठी संघटनांनी असहकार आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले होते.